Dasara Melava : शिवाजी पार्कवर ठाकरेंचीच ‘गर्जना’; दसरा मेळाव्यासाठी महापालिकेने दिली परवानगी
यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभा घेण्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Dasara Melava : यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभा घेण्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दसरा मेळाव्यासाठी ठाकरेसेनेकडून खासदार अनिल देसाई यांचा एकमेव अर्ज आल्याने बृहन्मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता ठाकरेसेनेचा दसरा मेळावा येथे होईल.
येत्या २० ऑक्टोबरला होणा-या या मेळाव्याला (Dasara Melava) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेसेना आणि शिंदेसेनेचे दोन वेगवेगळे मेळावे होतात. दसरा मेळावा हा राजकीय वर्तुळामध्ये महत्त्वाचा मानला जातो.
यंदाही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) फक्त ठाकरेसेनेने अर्ज केला होता. त्यांच्या अर्जाव्यतिरिक्त एकाही राजकीय पक्षाचा अर्ज महापालिकेकडे सादर झाला नाही. २०२२मध्ये शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अर्ज केला होता. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेने गतवर्षी दसरा मेळावा बीकेसी मैदानावर घेतला होता.






