रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते! केसनंद रस्त्यावर गांधीगिरी पद्धतीने निषेध; अधिकाऱ्यांची गाडी अडवून ग्रामस्थांनी बुजवले खड्डे
Updated On:

वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली केसनंद रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर चाळण झाली असून मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. अनेक अपघात झाले परंतु अधिकारी यांचे जाणीपूर्वक दुर्लक्ष करत होते.
नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याचा निषेध नोंदविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी अडवत गांधीगिरी करत निषेध करून केसनंद रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले.
यावेळी पुणे महानगरपालिका शासन नियुक्त सदस्य संदिप सातव व शांताराम बापू कटके यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित बहुसंख्येने उपस्थित होते.





