माहिती तंत्रज्ञान नियमांमधील काही तरतूदींना स्थगिती

मुंबई – नव्याने लागू करण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान विषयक नियमांमधील काही तरतूदींना मुंबई उच्च न्यायालयाने आज हंगामी स्थगिती दिली. ऑनलाईन प्रसिद्ध होणाऱ्या सर्व प्लॅटफॉर्मने आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे, असे या नियमावलीमध्ये म्हटले आहे.
या नियमावलीमधील 9 क्रमांकाच्या नियमातील उपनियम 1 आणि 3 अंतर्गत मार्गतर्शक सूचना आणि डिजीटल मीडिया नतिक मूल्ल्यांची अंमलबजावणी करणे सक्तीचे करण्यात आले होते. मात्र न्या. जी,एस. कुलकर्णी यांनी या उपनियमांना स्थगिती दिली आहे.
सकृतदर्शनी हे नियम याचिकाकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. कायदेशीर न्यूज पोर्टल द लीफलेट आणि पत्रकार निखिल वागळे यांनी दाखल केलेल्या याचिकांवर हा आदेश देण्यात आला, याचिकाकर्त्यांनी नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा येत असल्याने आ7ेप घेतला होता.





