मुंबई – फर्जंद, फत्तेशिकस्त आणि नुकताच प्रदर्शित झालेला पावनखिंड’च्या यशस्वी घोडदौडनंतर दिग्पाल लांजेकर आता आपला आगामी ‘शेर शिवराज’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
View this post on Instagram
काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित आणि दमदार टिझर रिलीज करण्यात आला होता. आज “शेर शिवराज’ या आगामी चित्रपटातील अफजलखानाचा पहिला लूक समोर आला आहे.
नुकतंच अभिनेता चिन्मय मांडेलकरने या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरद्वारे अफजलखानाचा पहिला लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये अफजल खानाची झलक पाहायला मिळते आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूडमध्ये ज्यांनी अनेक सिनेमात खलनायक गाजवला ते मुकेश ऋषी आहेत.
View this post on Instagram
तर अभिनेता चिन्मय मांडलेकर, दिग्पाल लांजेकर यांनी हे पोस्टर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारा चिन्मय मांडलेकर दिसत आहे, जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या मृणाल कुलकर्णी दिसत आहेत.
View this post on Instagram
शिवकालीन इतिहासातील अफझलखान वध ही घटना युद्धाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याच अफझलखानाचा वध हा केवळ शत्रूचा वध नव्हता, तर शिवाजी महाराजांनी त्यात उत्तम युद्धतंत्र आणि मानसिक दबावतंत्राचा अंतर्भाव केला होता. याच युद्धनीतीवर “शेर शिवराज” हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट येत्या २२ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे.