काही विमान कंपन्या बंद पडण्याची शक्यता
Updated On:

मुंबई – प्रवासी नसल्यामुळे भारतातील प्रवासी विमान कंपन्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात एक किंवा अनेक विमान कंपन्या या उद्योगांतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
या उद्योगातील सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशन या संस्थेने म्हटले आहे की, दोन महिन्यांत बऱ्याच विमान कंपन्यांनी कामगार कपात केली आहे. सरकारकडून या उद्योगाला कसलीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे आणखी एक-दोन कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो. भारतातील जेट एअरवेज कंपनी या उद्योगातून बाहेर पडली आहे. त्याचबरोबर एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी प्रयत्न
चालू आहेत.





