Jyoti Waghmare : २०२९ पूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? महिला खासदाराच्या दाव्याने खळबळ
Jyoti Waghmare : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असं सगळ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या शेतकऱ्यांना वाटतं. त्यामुळे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद फळाला येणार आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असा दावा ज्योती वाघमारेंनी केला आहे.

Jyoti Waghmare : महायुतीतील शिवसेना पक्षाच्या नेतेमंडळींकडून सातत्याने उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्याबाबत दावे केले जातात. आता पुन्हा एकदा हा दावा करण्यात आला आहे. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारेंनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा मोठा दावा केला आहे. त्य़ामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असं सगळ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या शेतकऱ्यांना वाटतं. त्यामुळे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद फळाला येणार आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असा दावा ज्योती वाघमारेंनी केला आहे.
ज्योती वाघमारे म्हणाल्या “एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, हेच साकडं आम्ही पंढरीच्या विठुरायाला घालतो आहे. जेव्हा एखादी बहीण आपल्या भावासाठी परमेश्वराकडे साकडं घालते, त्यावेळी त्यात प्रचंड मोठी ताकद असते. त्यामुळे एकनाथ शिंदे नक्कीच मुख्यमंत्री होणार.”
हे सांगताना ज्योती वाघमारे यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हे घडणार असल्याचा मोठा दावा केला आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्ष महायुतीचा एक घटक पक्ष असून खासदाराच्या दाव्याने महायुतीत तणावाची शक्यता निर्माण झाली आहे.
संजय राऊत, रोहित पवारांवर साधला निशाणा
सध्या राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर करण्यात आली. या मदतीवरून विरोधकांनी सरकाला धारेवर धरत मदत अपुरी असल्याचे म्हटले होती.
खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांनीही या मदतीवरुन सरकारवर टीका केली होती. ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत आणि रोहित पवार आधी तुम्ही शेतकऱ्यांना कमीत कमी ५ रुपयांचा बिस्कीटचा पुडा तरी द्या आणि मग सरकारला शिकवा, असा शब्दांत निशाणा साधला.





