धक्कादायक! पुण्यात शिक्षिका शिकवत असतानाच ऑनलाइन क्लासमध्ये लागला ‘पॉर्न व्हिडीओ’
Updated On:

राजगुरूनगर – करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिकवणी सुरु केल्या आहेत. मात्र ऑनलाइन शिक्षण घेत असताना अनेक विचीत्र प्रकार समोर येत आहेत. अशी एक घटना पुणे जिह्यातील राजगुरूनगर मधून समोर आली आहे. एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकवणी सुरु असताना पॉर्न व्हिडीओ लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
संबंधित प्रकार पाहून काही विद्यार्थ्यांनी चॅटबॉक्समध्ये मेसेज करत शिक्षिकेकडे याबाबत तक्रार केली. तसेच काहींनी याबाबत आपल्या पालकांना सांगितले. मात्र अश्लील व्हिडीओ सुरू झाल्याची माहिती संबंधित शिक्षिकेला कळाली नाही.
या प्रकारानंतर पालकांनी शाळेत जाऊन हा प्रकार मुख्यध्यापकाच्या कानावर घातला त्यानंतर मुख्यध्यापकांनी या प्रकरणाची विद्यार्थ्यांन मार्फत चौकशी केली.





