‘व्ही. शांताराम’ यांच्या बायोपिकमध्ये लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी; ‘जयश्री’च्या भूमिकेतील झलक समोर

V Shantaram Biopic | भारतीय सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माता ‘व्ही. शांताराम’ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ‘व्ही शांताराम – द रेबेल ऑफ इंडियन सिनेमा’ हा भव्यदिव्य बायोपिक लवकरच येत आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे अर्थात व्ही. शांताराम. यांचं आयुष्य आता पहिल्यांदाच एका चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत झळकणार आहे.
या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाची एक अपडेट समोर आली आहे. यातील ‘जयश्री’ या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची पहिली झलक समोर आली आहे.
या चित्रपटात ‘जयश्री’ ही केवळ व्ही. शांताराम यांची पत्नी नसून, त्यांच्या आयुष्यातील पहिली प्रेरणा, कलात्मक सहप्रवासी आणि भावनिक आधारस्तंभ म्हणून साकारली जाणार आहे.
— jyoti singh (@jyotisingh24061) December 9, 2025
ही महत्त्वाची व्यक्तिरेखा अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तमन्ना भाटिया गुलाबी साडीत, अत्यंत मोहक अंदाजात दिसत आहे. V Shantaram Biopic |
याआधी प्रदर्शित झालेल्या सिद्धांत चतुर्वेदीच्या व्ही. शांताराम यांच्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. आता तमन्ना भाटियाच्या ‘जयश्री’च्या पोस्टरमुळे त्या कथेतली भावनिक आणि कलात्मक बाजू अधिक गडद झाली आहे.
‘आणि… डॅा. काशिनाथ घाणेकर’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांनी या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. V Shantaram Biopic |
हेही वाचा:
“…असा जोडीदार असणे महत्त्वाचे”; प्रिया बापटने पोस्टद्वारे उमेशसाठी व्यक्त केले प्रेम





