विकी कौशलसोबत ‘महावतार’मध्ये दिसणार लोकप्रिय अभिनेत्री?

Mahavatar Film | बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा‘ या चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर आता विकी कौशल ‘महावतार’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटात विकी सोबत मुख्यभूमिकेत कोणती अभिनेत्री झळकणार त्याबाबतची अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण ‘महावतार’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. दीपिका आणि निर्मात्यामध्ये चर्चा सुरू असल्याचे बोले जात आहे. पहिल्यांदाच विकी कौशल आणि दीपिका पादुकोण स्क्रीन एकत्र शेअर करणार आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही मात्र अधिकृत घोषणा करण्यात आलेले नाही. Mahavatar Film |
View this post on Instagram
‘महावतार‘ चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘महावतार’ चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन आणि दिग्दर्शन अमर कौशिक करत आहेत. ‘महावतार’ हा पौराणिक ड्रामा आहे. जो भगवान परशुरामच्या कथेवर आधारित आहे. Mahavatar Film |
View this post on Instagram
याशिवाय विकी कौशलचा लवकरच ‘लव्ह अँड वॉर’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील झळकणार आहे. तर दीपिकाला ‘कल्की’मधील एक्झिटनंतर आता हा नवा चित्रपट मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. Mahavatar Film |
हेही वाचा:
पिंपरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सर्वांगीण विकास; प्रभाकर गावडे यांचे गौरोद्गार





