Vicky Kaushal: ‘तुझ्यासारखा मुलगा मिळणं माझं भाग्य’; विकी कौशलच्या वाढदिवशी वडील शाम कौशल भावूक
Vicky Kaushal विकी कौशल हा सध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘उरी’, ‘सरदार उधम’, ‘मसान’ आणि ‘सॅम बहादूर’सारख्या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाचे मोठे कौतुक झाले होते.

Vicky Kaushal: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal )आज १६ मे रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी त्याचे वडील आणि प्रसिद्ध ॲक्शन दिग्दर्शक शाम कौशल यांनी मुलासाठी भावूक पोस्ट शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
शाम कौशल यांनी इन्स्टाग्रामवर विकीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला. या फोटोत दोघेही सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. फोटोसोबत त्यांनी अतिशय भावनिक कॅप्शन लिहिले आहे. “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बेटा… देवाचे आशीर्वाद कायम तुझ्यासोबत राहो. खूप प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुझ्यासारखा मुलगा मिळणं हे माझं भाग्य आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान आणि धन्य समजतो. रबची कृपा तुझ्यावर कायम राहो. जोरदार जादूची झप्पी,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. (Vicky Kaushal)
या पोस्टनंतर चाहत्यांनीही विकीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी कमेंट करत विकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काही चाहत्यांनी या फोटोमध्ये विकी आणि त्याचा मुलगा विहान यांच्यातील साम्यही नमूद केले. एका युजरने लिहिले की, “एका फोटोमध्ये तीन पिढ्यांची झलक दिसते.” विकी आणि कतरिना कैफ यांच्या मुलाचे नाव विहान असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली. (Vicky Kaushal)
View this post on Instagram
विकी कौशल हा सध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘उरी’, ‘सरदार उधम’, ‘मसान’ आणि ‘सॅम बहादूर’सारख्या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाचे मोठे कौतुक झाले होते. (Vicky Kaushal)
दुसरीकडे त्याचे वडील शाम कौशल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ॲक्शन दिग्दर्शक आहेत. त्यांनी सुरुवातीला स्टंटमॅन म्हणून काम केले. त्यानंतर १९९० पासून त्यांनी ॲक्शन दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळायला सुरुवात केली. मल्याळम चित्रपट ‘इंद्रजालम’ हा ॲक्शन दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता.
यानंतर त्यांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘पीके’, ‘टायगर जिंदा है’, ‘पद्मावत’, ‘संजू’ आणि ‘सिंबा’सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये ॲक्शन दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. बॉलिवूडसह काही हॉलिवूड प्रकल्पांमध्येही त्यांनी योगदान दिले आहे. (Vicky Kaushal)
दरम्यान, विकी कौशलच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा पाऊस पडत असून, त्याच्या कुटुंबातील प्रेमळ नातेसंबंधांचीही सर्वत्र चर्चा होत आहे.





