विकी कौशलच्या नव्या चित्रपटाची घोषणा; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Vicky Kaushal | अभिनेता विकी कौशलने अल्पावधीतच सिनेसृष्टीत मोठे यश मिळवले आहे. त्याने एकापेक्षा एक अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच त्याच्या एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. विकी कौशलचा ‘महावतार’ सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये विकी भगवान विष्णूचा सहावा अवतार असलेल्या परशुरामची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक देखील शेअर करण्यात आला आहे. Vicky Kaushal |
दिनेश विजानच्या प्रोडक्शन हाऊस मॅडॉक फिल्म्सने बुधवारी विकी कौशल स्टारर ‘महावतार’ या नवीन चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर शेअर केली आहे. धर्माचं रक्षण करणारा योद्धा चिरंजीवी परशुराम यांची कहाणी असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. पोस्टरमध्ये विकीच्या लूकसोबतच चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. Vicky Kaushal |
View this post on Instagram
‘महावतार’ 2026 च्या ख्रिसमसमध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक करणार आहेत. या चित्रपटातील पोस्टरमध्ये लांब दाढी, वर बांधलेले केस, भगवे कपडे, हातात परशु, डोळ्यात आग असा विकीचा लूक समोर आला आहे.
विकीला ‘महावतार’च्या माध्यमातून पहिला पौराणिक चित्रपट मिळाला आहे. भगवान हनुमान आणि अश्वत्थामा यांच्यासोबत हिंदू पौराणिक कथांमध्ये उल्लेख केलेल्या चिरंजीवांपैकी परशुराम देखील एक आहे. विकी कौशलला या भूमिकेत पाहणे चाहत्यांसाठी खूप रोमांचक असणार आहे.
‘महावतार’शिवाय विकी कौशलचा ‘छावा’ सिनेमाही पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यात तो छत्रपती संभाजी राजांची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा:
अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला लिहिले पत्र; अभिनेत्रीचे केले कौतुक





