‘बिग बॉस सीझन १९’मधील प्रणित मोरेला लोकप्रिय अभिनेत्रीने दिला पाठिंबा; म्हणाली “तोच विजेता झाला पाहिजे”

Arti Singh Supports Pranit More | ‘बिग बॉस सीझन १९’ शो अधिक रंजक होत आहे. यातील स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मोठी लोकप्रियता मिळत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री व ‘बिग बॉस’ची एक्स स्पर्धक आरती सिंगनं प्रणित मोरेला सपोर्ट केला आहे. तिने त्याच्या खेळाचे देखील कौतुक केले आहे.
आरती सिंग बॉलिवूड बबल टेली या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये म्हणाली, “मला वाटतं प्रणितनंच हा शो जिंकला पाहिजे. मला त्याचा गेम आवडत आहे. तो शोमध्ये कायम इतरांना हसवत असतो. प्रणित कुणाला टोमणा मारायचा असेल तरी तो त्याच्या विनोदी शैलीतच उत्तर देतो. त्याचा स्वभाव खूप छान असून, घरातील इतर स्पर्धकांबरोबरचं त्याचं बॉण्डिंगही जबरदस्त आहे. तो या खेळात आपली प्रतिष्ठा राखत आहे, जो इतरांचा आदर करत आहे. तोच या शोचा विजेता झाला पाहिजे,” असे ठाम मत तिने यावेळी व्यक्त केले. Arti Singh Supports Pranit More |
View this post on Instagram
यावेळी आरतीने ‘बिग बॉस’मधील आधीच्या स्पर्धकांचाही संदर्भ दिला. तिने मृदुल तिवारीचं कौतुक करत म्हटलं की, “तोसुद्धा खेळात कायम भान ठेवून खेळत होता. त्याने टास्कसाठी कधी आरडाओरडा केला नाही, कुणाला मागे खेचण्यासाठी आपला गेम खेळला नाही किंवा टीआरपीसाठी मुद्दाम भांडणं केली नाहीत. तसंच आता मला प्रणितबाबत जाणवत आहे. त्यामुळे मला आता प्रणित आवडत आहे, त्याचा गेम आवडत आहे. त्यामुळे तोच शो जिंकला पाहिजे, असं वाटतं”.
आरती सिंगसोबतच शिव ठाकरे, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत केळकर ह्या कलाकरांनी देखील प्रणित मोरेला सपोर्ट केला आहे.’बिग बॉस’च्या घरातील प्रणितचा मनमिळाऊ स्वभाव, विनोदी शैली आणि टास्कदरम्यानचा संयम या गोष्टी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. ज्यामुळे त्याला अनेकांचा पाठिंबा मिळत आहे.
हेही वाचा:
“जर तैवानवर हल्ला झाला तर…” ; पंतप्रधान ताकाची यांच्या इशाऱ्यानंतर जपान-चीनमध्ये तणाव


