Bigg Boss 19 House : बिग बॅासच्या घराची पहिली झलक समोर! नव्या घरात कोणते झालेत बदल? समजून घ्या ५ पाईंट्समधून…

Bigg Boss 19 House : येत्या २४ अॅागस्टपासून म्हणजेच उद्या रविवारपासून बिग बॅास १९ या रियालिटी शोच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. यामुळे सध्या सर्वत्र या शोची मोठी चर्चा सुरू आहे. या नव्या पर्वात बिग बॅासच्या घरात कोणते कलाकार स्पर्धेक म्हणून दाखल होणार याची चर्चाही सुरू आहे. अशातच आता बिग बॅासच्या घराची पहिली झलक चाहत्यांच्या भेटीला आली आहे.
खरंतर बिग बॅासच्या घर हे या शोमधील सर्वांत महत्वाचं आकर्षक केंद्र असतं. आता उद्यापासून सुरू होणाऱ्या या शोसाठी बिग बॅासचं घर सजलं आहे. त्याची पहिली झलक आता समोर आली आहे. या वर्षीदेखील आर्ट दिग्दर्शक ओमंग कुमार आणि प्रॉडक्शन डिझायनर वनिता गरुड यांनी निसर्गाच्या साधेपणापासून प्रेरणा घेऊन जंगल थीमवर घराचा लूक डिझाइन केला आहे.
१. गार्डन एरिया : बिग बॉसच्या घरातील सर्वांत महत्वाचा खेळाच्या दृष्टीने भाग समजला जातो तो म्हणजे गार्डन एरिया. यंदाच्या वर्षी मैदानावर जीमसाठी जागा कमी देण्यात आली आहे.
२. किचन एरिया / लिव्हिंग एरिया : घरातील किचिन आणि लिव्हिंग लिव्हिंगरुमध्ये सजावटीमध्ये प्राण्यांपासून प्रेरित डिझाईन्स आणि ठळक रंगांचा उपयोग करण्यात आला आहे. किचन एरियामध्ये नेहमीच वादविवादाचे प्रसंग घडत असतात. येथे स्पर्थकांचा कामावरून संघर्ष पाहायला मिळतो. यंदाच्या सीझनमध्ये किचन एरिया लहान तयार करण्यात आला आहे.
३ बेडरूम : बिग बॅासच्या घरातील बेडरूम शांततेची अनुभूती देते. ही खोली आरामदायी ठिकाणासारखी वाटते. या रुममध्ये सिंगल बेड पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत. आता फक्त डबल बेड आणि एक मोठा बेड असून ज्यामध्ये तीन स्पर्धक आरामात झोपू शकतात.
४. असेंबली रूम : बिग बॉसच्या घरात यंदाच्या वर्षी नवीन असेंबली रूम तयार करण्यात आला आहे. यंदाच्या सीजनची थीम ‘घरवालों की सरकार’ अशी आहे.
५. बाथरूम एरिया: बाथरूमच्या डिझाईनमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. मात्र, ज्या ठिकाणी स्पर्धक आपल्या वस्तू ठेवण्यात ती जागा गुप्त ठेवण्यात आली आहे.
कुठे पाहता येणार शो?
येत्या २४ अॅागस्टपासून बिग बॅास हिंदीचा नवा सीझन कलर्स मराठी या वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे. याशिवाय हा रियालिटी शो हॅाटस्टारवरही पाहायला मिळणार आहे. यंदाची बिग बॅासची थीम राजकारणावर आधारित असल्याची चर्चा असून, या शोसाठी चाहते आतुर झाले आहेत.





