Pope Francis : पोप फ्रान्सिस पुढील वर्षी येणार भारतभेटीवर

रोम – ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस पुढील वर्षी भारतभेटीवर येणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस ते मंगोलियालाही भेट देण्याचे नियोजन करत आहेत. व्हॅटिकन वृत्तसंस्थेच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.
“पुढील वर्षी आपण भारतात जाऊ. त्यानंतर 29 सप्टेंबरला मार्सेलिसला आणि त्यानंतर मंगोलियाला जाऊ. मात्र ते अजून निश्चित नाही. या वर्षी लिस्बनला जाण्याची शक्यता आहे. ‘असे पोप म्हणाले.
पोप यांनी युरोपातील छोट्या देशांना भेट देण्यावर विशेष भर दिला आहे. काही देश हे युरोपाच्या मोठ्या आकाराच्या तुलनेत दुर्लक्षित राहिले आहेत. तेथे आपल्याला भेट द्यायची आहे, असे पोप यांनी स्पष्ट केले आहे. त्यामध्ये पूर्वाश्रमीच्या काही ब्रिटीश वसाहतींचाही समावेश असणार आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/more-than-1400-killed-as-7-8-magnitude-earthquake-hits-turkey-and-syria/
अल्बानिया आणि साऊथ सुदानलाही भेट देण्याची योजना असल्याचे पोप यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.





