Pope Francis : पोप फ्रान्सिस यांची प्रकृती गंभीर

रोम : कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस गेल्या आठवड्यापासून रुग्णालयात दाखल आहेत. त्याच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. ब्राँकायटिसच्या उपचारांसाठी आणि इतर चाचण्यांसाठी त्यांना रोमच्या जेमेली पॉलीक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांची प्रकृती आता गंभीर झाली आहे. ८८ वर्षीय पोप फ्रान्सिस श्वसनाच्या आजाराने ग्रस्त आहेत.
पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना सांगितले आहे की त्यांना भीती आहे की ते यावेळी वाचणार नाहीत, कारण ते दुहेरी फुफ्फुसांच्या न्यूमोनियाशी झुंजत आहेत. न्यूज वेबसाइट पॉलिटिकोच्या वृत्तानुसार, पोप फ्रान्सिस आता पूर्णपणे वैद्यकीय उपचारांवर अवलंबून आहेत. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ते एका आठवड्यापासून ब्राँकायटिसने त्रस्त होते, पण त्यांना रुग्णालयात जायचे नव्हते. जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की जर त्यांनी लवकर उपचार घेतले नाहीत तर त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, तेव्हा त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. पोप फ्रान्सिस यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे त्यांना त्यांच्या उत्तराधिकाराच्या चिंता सतावत आहे.





