पुनम पांडेनी दुसऱ्या लग्नाबाबत स्पष्ट केली भूमिका, म्हणाली…

Poonam Pandey | अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करते. काही महिन्यांपूर्वी तिने आपल्या मृत्यूची खोटी अफवा पसरवली होती. यानंतर तिला खूप ट्रोल देखील करण्यात आले. यानंतर आता तिच्या लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे.
पूनम पांडे नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यादरम्यान पूनमला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर तिने अतिशय मजेशीर उत्तर दिले. पूनम म्हणाली, “लग्न करणे ही आनंदाची बातमी कशी? लग्न झाल्यावर किती लोक सुखी असतात. आपण रोज एकतरी घटस्फोटाची बातमी ऐकतो.”
View this post on Instagram
याच व्हिडीओत पूनम पांडेला तिचा मित्र मुनव्वर फारुकीबद्दल विचारले. त्यावर पूनम “नो कमेंट्स” असे म्हणून तिथून निघून जाते. दरम्यान, पूनम पांडेने चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक सॅम बॉम्बेशी 2020 मध्ये लग्न होते. मात्र त्याच्यावर मारहाणीचे आरोप केल्यानंतर ती त्याच्यापासून विभक्त झाली.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये पूनम पांडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या मृत्यूच्या खोट्या बातम्यांबाबत एक पोस्ट केली होती. तिच्या मृत्यूचे कारण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असल्याचे सांगण्यात आले. या बातमीने तिचे चाहते आणि इंडस्ट्रीतील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याचवेळी, काही दिवसांनंतर पूनमने स्वत: इन्स्टावर लाईव्ह येऊन सर्व्हायकल कॅन्सरची जनजागृती करण्यासाठी ही अफवा पसरवल्याचे सांगितले होते.





