पूजा हेगडेने मानधन वाढवले; आता एका सिनेमासाठी घेणार तब्ब्ल एवढी रक्कम…

पुणे – पूजा हेगडे लवकरच प्रभासबरोबर “राधे शाम’मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय दक्षिणेतील स्टार थलपती विजय बरोबर ती एका सिनेमात असणार आहे. अर्थात या दोघांच्या एकत्रित सिनेमाची अद्याप अधिकृतपणे घोषणा केली गेलेली नाही.
View this post on Instagram
या सिनेमाचे शिर्षक देखील अद्याप निश्चित झालेले नाही. हा सिनेमा थलपती विजयचा 65 वा सिनेमा असणार आहे. म्हणून सध्या तरी या सिनेमाला “विजय 65′ म्हणूनच संबोधले जात आहे. प्रभासबरोबर काम केल्यामुळे तिची ब्रॅन्ड व्हॅल्यू वाढली आहे. तिने आता आपल्या मानधनामध्ये वाढ केली आहे. आता ती एका सिनेमासाठी 2.5 कोटी रुपये मानधन घेणार आहे.
View this post on Instagram
प्रभासबरोबरचा “राधे शाम’ हा पूजा हेगडेचा दक्षिणात्य सिनेमातील 8 वर्षांनंतर पुनरागमन करणारा सिनेमा असणार आहे. पूजाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवातच दक्षिणात्य सिनेमांमधून केली होती. हिंदीमध्ये जम बसवण्यापूर्वी दीर्घकाळ ती दक्षिणेतच सक्रिय होती.
View this post on Instagram
यापूर्वी अल्लू अर्जुन बरोबर “वैकुंठपुरमलो’मध्ये पूजाने काम केले होते. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर तिच्या वाट्याला “राधे शाम’ आणि “सर्कस’ची ऑफर आली. आता वाढीव मानधनाच्या आधारे ती दक्षिणेबरोबर हिंदीमध्येही जबरदस्त परफॉर्मन्स देण्याची तयारी करते आहे.
View this post on Instagram





