मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं! भाजपने भूमिका केली स्पष्ट; आघाडीतील नेत्यांवर उठवली टीकेची झोड

Keshav Upadhyay : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी थेट राजधानी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनला सुरूवात केली आहे. त्यांच्या या आंदोलनला महाराष्ट्रातील गावागावातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.
आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव दाखल झाले आहेत. आता गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा पक्का निर्धार केल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. त्यांच्या या आंदोलनला महायुतीमधील काही आमदार आणि खासदार यांनी पाठिंबा दिल्याची माहिती आहे. अशातच आता भाजपकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली असून, आघाडीतून तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी ओबसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भाजपाची भूमिका असल्याचं सांगितलं आहे. तसेच मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन हे शांततामय ऐतिहासिक होईलच, पण या आंदोलनाबाबत बोलतय कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे उध्दव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेस पक्ष गप्प का? असाही सवाल त्यांनी केला आहे.
केशव उपाध्ये यांची पोस्ट
मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन हे शांततामय ऐतिहासिक होईलच, पण या आंदोलनाबाबत बोलतय कोण? …
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे उध्दव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेस पक्ष
मराठा समाजाच्या मूक मोर्चाची ‘मुका मो’र्चा म्हणून हेटाळणी करणारे सामना
आरक्षणचे विषय आता नको म्हणणारे शरद पवार
आणि वर्षानुवर्षे मराठा समाज केवळ मतपेढी म्हणून पाहणारा कॅाग्रेस पक्ष
आजही हे तिघेही केवळ राजकारण करू पहात आहेत. ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मनोज जरांगे यांच्या मागणीवर हे तिघेही मूग गिळून गप्प आहेत. आता या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे. याबाबत कायदेशीर बाबी भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनोज जरांगे यांनी सरकार वर टीका करावी, लोकशाहीतील तो अधिकारच आहे. पण आता शरद पवार, उध्दव ठाकरे व कॅाग्रेस पक्षाकडे त्यांच्या मागणीबाबत स्पष्टता मागायला हवी.
कारण सर्वाधिक संवेदनशील हे देवेंद्रजी सरकार आहे व मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय हा देवेंद्रजीनी घेतला, आताही अशा वेळी त्यांच्या नावाने टीका करून काय साध्य करीत आहोत? मराठा समाजाला १० टक्के आरक्षण महायुती सरकार असतानाच मिळाले व सध्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला रद्द केले नाही.
मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन हे शांततामय ऐतिहासिक होईलच, पण या आंदोलनाबाबत बोलतय कोण? …
▪️महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे उध्दव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेस पक्ष
▪️मराठा समाजाच्या मूक मोर्चाची ‘मुका मो’र्चा म्हणून हेटाळणी करणारे सामना
▪️आरक्षणचे…— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 29, 2025
शिंदे समितीस मुदतवाढ मिळावी ही त्यांची मागणी होती त्याला सहा महिने मुदत वाढ दिली. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांना नोकरी मिळावी अशी मागणी होती ती सुध्दा जवळपास पूर्ण झाली. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून मराठा समाजातील एक लाख उद्योजक निर्माण करण्यासाठी, ८३२० कोटींचे कर्ज वाटप केले.
राजर्षी शाहू महाराज शुल्कप्रतिपूर्ती योजनेतून मराठा समाजातील १७.५४ लाख विद्यार्थ्यांना ९२६२ कोटी दिले. मराठा समाजाला न्याय देणारे देवेंद्रजी व या उलट कोणतीही भूमिका न घेणारे कॅाग्रेस, उबाठा, शरद पवार… महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाशी द्रोह करणारे हे या तीन पक्षांचे राजकारण हाणून पाडा!





