राजकारणामुळे पडली फूट! पतीच्या निर्णयामुळे पत्नीने गाठलं माहेर; म्हणाल्या ” राजकीय वाद टाळण्यासाठी…”

Archana Dehankar : राज्याची उपराजधानी नागपूर महापालिकेची निवडणूक मोठी चुरशीची होणार असून भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अनेक निष्ठावंतांना तिकीट नाकारल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॅार्म मिळवण्यासठी मोठा राडा झाल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. नागपूर महापालिकेसाठी एक नाव चर्चेत होते, पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. यानंतर एक अशी घटना घडली ज्याची चर्चा नागपुरातच नव्हे तर राज्यभरात होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमधील विश्वासू असलेल्या देवदत्त डेहनकर यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली. यामुळे ते नाराज झाले, त्यांनी पक्षाच्या राजीनामा दिला असून बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर त्यांची पत्नी नागपूरच्या माजी महापौर राहिलेल्या अर्जना डेहनकर यांनी पतीचे घर सोडून माहेरी निघून गेल्या आहेत. त्यांनी असे का केले आहे, याबाबतचा खुलासा त्यांनी केला आहे.
अर्चना डेहनकर यांनी त्यांचे पती विनायक डेहनकर यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही अपक्ष फॉर्म भरु नका, पण त्यांनी अर्ज केला. त्यामुळे माझा निर्णय हा होता, की आपण पक्षासोबत राहिलं पाहिजे. राजकीय वाद टाळण्यासाठी, ज्या विचारधारेत आम्ही करतो, त्यासोबत राहण्यासाठी मी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रकारानंतर नागपुरच्या स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच माहेरी राहून भाजपचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपण थोडं बाजूला राहिलं पाहिजे, जेणेकरुन त्यांचा राग शांत होईल आणि नंतर विचार करता येईल, असे त्या म्हणाल्या.
कोण आहेत अर्चना डेहनकर?
अर्चना डेहनकर या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. नागपूरच्या त्या माजी महापौर राहिलेल्य आहेत. भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा देखील आहेत. १९९७ आणि २००७ मध्ये त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. २००९ मध्ये त्या नागपूर महापालिकेच्या महापौर झाल्या होत्या. याशिवाय त्यांनी पक्षाची अनेक पदे भूषवली आहे. स्थानिक राजकारणात त्यांचे स्वतःचे नाव आहे.
हेही वाचा : भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त मोठी गर्दी; अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून विजयस्तंभाला अभिवादन





