Political News : ‘या’ राज्यातील सरकार कोसळणार? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांच्या राजकारणात मोठ्या घडामोडी (Political News) घडत असून त्याचे तीव्र पडसाद राष्ट्रीय राजकारणावर पडताना दिसत आहेत.

Political News : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांच्या राजकारणात मोठ्या घडामोडी (Political News) घडत असून त्याचे तीव्र पडसाद राष्ट्रीय राजकारणावर पडताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमधील राजकीय अस्थिरतेच्या चर्चेनंतर आता आणखी एका राज्यातील सरकार धोक्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सच्या सरकारमध्ये सध्या काहीही (Political News) आलबेल नसून, हे सरकार कधीही कोसळू शकते, असा खळबळजनक दावा भारतीय जनता पक्षाचे जम्मू-काश्मीरमधील विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी केला आहे.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारविरोधात भाजप एक मोठा मोर्चा काढण्याच्या तयारीत असून, या रॅलीपूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शर्मा यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.
सुनील शर्मा यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार कोणत्याही किमतीत, अगदी फुकट विकले जाण्यास तयार आहेत, परंतु भाजप त्यांना आपल्या पक्षात घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यमान सरकार पाडून किंवा पक्षात फूट पाडून भाजपला सध्या सरकार स्थापन करण्याची कोणतीही घाई किंवा इच्छा नाही, कारण समोरचा पक्ष आधीच फुटलेला असून त्यांच्यात मोठी दुफळी माजली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सध्या भाजपला सरकार स्थापन करण्याची कोणतीही गरज नसून, तिथली संपूर्ण परिस्थिती आणि व्यवस्था आधीच भाजपच्याच नियंत्रणाखाली चालली आहे, असा दावाही त्यांनी केला.
पुढे बोलताना शर्मा म्हणाले की, राज्यात सरकार स्थापन न करताही आमच्या अजेंड्यानुसार सर्व गोष्टी सुरळीत घडत आहेत. जर या देशहिताच्या कामांमध्ये आम्हाला काही अडचणी आल्या असत्या, तर आम्ही नक्कीच सरकार बनवण्यासाठी प्रयत्न केला असता. परंतु, सध्या भाजप जेव्हा कधी जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करेल, तेव्हा ते कोणाच्या कुबड्या न घेता पूर्ण बहुमताचेच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर काश्मीर सरकारनेही शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये आता कलम ३७० पुन्हा कधीही लागू होणार नाही, ही वस्तुस्थिती तिथल्या राज्य सरकारनेही स्वीकारली आहे. तसेच आम्ही कलम ३५-ए संपुष्टात आणू असे म्हटले होते आणि ते प्रत्यक्षात हटवून दाखवले. जमात-ए-इस्लामीपासून ते हुरियत कॉन्फरन्सपर्यंतच्या सर्व देशविरोधी संघटनांवर बंदी घातली जाईल, हे भाजपचे आश्वासन पूर्ण झाले आहे.
राज्यात सध्या एकही व्यक्ती राजकीय कारणास्तव (Political News) कैदेत नसून, जे तुरुंगात आहेत ते केवळ देशद्रोही आहेत, ही बाबही विद्यमान सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे सरकार न बनवताही सर्व कामे होत असल्याने भाजप सध्या तरी सरकार पाडण्याच्या घाईत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विधानामुळे आता जम्मू-काश्मीरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.






