Rohini Khadse : “भक्तांच्याच श्रद्धेवर शंका घ्यायची, याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात”; भाजप आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन रोहिणी खडसे संतापल्या
Rohini Khadse : या दानअपहार प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे.

Rohini Khadse : अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावरुन राजकारण चांगलंच तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. अशातच भाजप आमदारने एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा नाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावरुन शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी एक्सवरुन पोस्ट शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Rohini Khadse)
अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिरातील दानचोरी प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. या प्रकरणामुळे नेत्यांपासून सामान्य नागरिकांमध्ये रोष आहे. या दानअपहार प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे. रोहिणी खडसे यांनी एक्सवरुन पोस्ट शेअर करत भाजप नेत्याने केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत सडकून टीका केली आहे.
रोहिणी खडसेंची एक्सवरील पोस्ट (Rohini Khadse)
हे आहेत उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार सतीश महाना. हे म्हणतात की “ज्यांनी खऱ्या श्रद्धेने दान नाही दिले, त्यांचेच दान चोरीला गेले आहे” घरात अन्नाचा कण नसताना आपल्या पदराच्या गाठीशी बांधलेला रुपया, राम मंदिराच्या दानासाठी लोकांनी दिला आहे आणि हा कोण कुठला महाना त्यांची श्रद्धा खोटी ठरवतोय? असा संतप्त सवाल विचारला आहे.
हे आहेत उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार सतीश महाना. हे म्हणतात की “ज्यांनी खऱ्या श्रद्धेने दान नाही दिले, त्यांचेच दान चोरीला गेले आहे”
घरात अन्नाचा कण नसताना आपल्या पदराच्या गाठीशी बांधलेला रुपया, राम मंदिराच्या दानासाठी लोकांनी दिला आहे आणि हा कोण कुठला महाना… pic.twitter.com/kyuDv5g0oo
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 16, 2026
प्रभू श्रीरामांच्या मंदिरातील दानपेटीतून दान चोरी तुम्ही करायचे आणि मग भक्तांच्याच श्रद्धेवर शंका घ्यायची, याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. अशांसाठी फार समर्पक गाणं आहे..पिते दूध डोळे मिटून जात मांजराची मनी चोरट्यांच्या का रे भीती चांदण्यांची ! अशा शब्दांत रोहिणी खडसेंनी टीका केली आहे.
विकासकामांमुळे देणग्यांच्या वापराबाबत कोणतीही शंका राहू नये : सतीश महाना (Rohini Khadse)
भक्तांनी दिलेल्या देणग्या मंदिराच्या बांधकाम आणि विकास कामांसाठी वापरल्या गेल्या आहेत. राम मंदिराचे भव्य स्वरूप हेच सिद्ध करते की देणग्यांचा सुज्ञपणे वापर केला गेला आहे. देशभरातील कोट्यवधी लोकांनी आपल्या भक्तीने मंदिराच्या उभारणीसाठी योगदान दिले आहे आणि त्याचे परिणाम आज सर्वांना दिसत आहेत. मंदिरातील विकासकामांमुळे देणग्यांच्या वापराबाबत कोणतीही शंका राहू नये, असे उत्तरप्रदेश राज्यातील भाजप आमदार सतीश महाना यांनी म्हटलं आहे.
निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे : विरोधकांची मागणी (Rohini Khadse)
अयोध्या राम मंदिरातील देणगी घोटाळा प्रकरणी SIT चौकशी करत आहे. सतीश महाना यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भक्तांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याऐवजी या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
कोण आहेत सतीश महाना? (Rohini Khadse)
सतीश महाना हे भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेश विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते कानपूरमधील महाराजपूर मतदारसंघातून सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी यापूर्वी योगी आदित्यनाथ सरकारमध्ये औद्योगिक विकास मंत्री म्हणूनही काम केले आहे.
Jennifer Winget: जेनिफर विंगेट पुन्हा अडकणार विवाहबंधनात? दुसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण





