Political News : शिवसेना, राष्ट्रवादी नंतर आणखी एक पक्ष फुटणार? राजकीय घडामोडींना वेग
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षांतर्गत मोठ्या बंडाच्या उंबरठ्यावर (Political News) उभी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Political News : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षांतर्गत मोठ्या बंडाच्या उंबरठ्यावर (Political News) उभी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली असून, पक्षाचे तब्बल १२ हून अधिक खासदार लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप कोणत्याही नेत्याने या घडामोडींना (Political News) अधिकृत दुजोरा दिलेला नसला, तरी पक्षाला गळती लागल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
पक्षांतर बंदी कायद्यातून सुटण्यासाठी मोठी रणनीती
‘संघवाद प्रतिदिन’च्या अहवालानुसार, भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या खासदारांचा आकडा १२ वरून पार १५ ते २० पर्यंत पोहोचू शकतो. लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे एकूण २९ खासदार आहेत. पक्षांतर बंदी कायद्याच्या (Political News) कचाट्यात न अडकता थेट भाजपमध्ये प्रवेश करता यावा, यासाठी या बंडखोर खासदारांची पडद्यामागे मोठी रणनीती सुरू आहे.
कायदा काय आहे?
नियमांनुसार, जर पक्षाच्या एकूण खासदारांपैकी दोन-तृतीयांश (२/३) खासदारांनी एकत्र येऊन गट बदलला, तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई होत नाही. नेमका हाच आकडा गाठण्यासाठी सध्या खासदारांची जुळवाजुळव आणि अंतर्गत बोलणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या आगामी पावसाळी अधिवेशनापर्यंत हे चित्र पूर्णपणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
ममता बॅनर्जींच्या निकटवर्तीयांचाच समावेश?
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, भाजपच्या वाटेवर असलेले अनेक बंडखोर खासदार हे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात.
त्यामुळे हा बंड यशस्वी झाल्यास ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. केवळ खासदारच नव्हे, तर पक्षाचे काही आमदार आणि नगरसेवकांनी आधीच पक्षापासून अंतर राखण्यास सुरुवात केली असून काहींनी राजीनामेही दिले आहेत.
आंदोलनात आमदारांची दांडी
निवडणुकीतील पराभवानंतर मरगळ झटकून तृणमूल काँग्रेसने पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून २० मे रोजी पक्षाने एका मोठ्या आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र, या आंदोलनाने पक्षातील फूट उघड पाडली.
पक्षाच्या एकूण ८० आमदारांपैकी केवळ ३५ आमदार या आंदोलनाला उपस्थित होते, तर बहुतांश आमदारांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली. आमदारांच्या या अनुपस्थितीमुळे पक्षात सर्व काही अलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या संभाव्य खासदारांची नावे आणि त्यांच्या पक्षप्रवेशाची (Political News) तारीख गुप्त ठेवण्यात आली आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील या संभाव्य राजकीय भूकंपामुळे देशातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.






