Mumbai News: मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को संकुलात लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचा ओव्हरडोस झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 28 वर्षीय तरुण आणि एका 24 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. दोन्ही मृत तरुण-तरुणी एमबीएचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी कठोर पावले उचलत कार्यक्रमाचे आयोजक, नेस्कोचे कर्मचारी आणि मृतांच्या दोन मित्रांसह 5 जणांना अटक केली आहे. Mumbai News मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलातील हॉल क्रमांक ४ मध्ये ११ एप्रिल रोजी संध्याकाळी सुमारे ६ वाजता या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टला सुरुवात झाली होती. या कार्यक्रमासाठी तब्बल तीन ते चार हजार तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. Mumbai News Mumbai News: हाय-प्रोफाईल पार्टीवर पुन्हा प्रश्नचिन्ह; मुंबईच्या कॉन्सर्टमधील धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश कॉन्सर्टसाठी लाखो रुपयांचे पॅकेज या कॉन्सर्टसाठी विविध प्रकारचे एन्ट्री पॅकेज आणि तिकीट श्रेणी ठेवण्यात आल्या होत्या. जनरल एन्ट्री तिकीट सुमारे १४९९ रुपयांपासून सुरू होत होते, तर व्हीआयपी तिकीट २४९९ रुपयांपर्यंत होते. याशिवाय बॅकस्टेज पास सुमारे ५९९९ रुपयांना उपलब्ध होते. तसेच स्टेज टेबल आणि व्हीआयपी टेबलसाठी तब्बल १ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज ठेवण्यात आले होते. कॉन्सर्टदरम्यान काही तरुणांनी मोठ्या प्रमाणात मद्यपान आणि ड्रग्जचे सेवन केल्याची माहिती समोर येत आहे. ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्यामुळे काही जणांची प्रकृती अचानक बिघडली. यामध्ये एका नामांकित कॉलेजमधील एक तरुण आणि एका तरुणीचा यांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Mumbai News पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु या घटनेने मुंबईतील हाय-प्रोफाईल पार्ट्यांमधील अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Mumbai News हेही वाचा: China vs US: “आमच्या अंतर्गत बाबींमध्ये बाहेरच्या देशाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही,” चीनचा अमेरिकेला इशारा