न्यू ईयर सेलिब्रेशनवर असणार पोलिसांचा वॉच; मद्यपान करून वाहन चालवल्यास होणार थेट कारवाई

New Year Celebration | सरत्या वर्षाला निरोप देऊन 2025 या नवीन वर्षाचे स्वागतासाठी देशभरात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, रिसॉर्टकडूनही तयारी करण्यात आली आहे. यासाठी नागपूर, पुणे, मुंबई सज्ज झाले आहे. मात्र न्यू ईयर सेलिब्रेशनवर असणार पोलिसांची करडी नजर असणार आहे. यासाठी ठीकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
नागपूर
नागपूर शहरात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तब्बल 4 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरात ठिकठिकाणी बंदोबस्तात उपस्थित असतील. कोणी ही कायद्याचे उल्लंघन केल्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. नागपुरात हॉटेल, रेस्टॉरंट, पब किंवा बार मध्ये जाऊन मद्यपान करून धिंगाणा केल्यास संबंधित बार, पब आणि रेस्टॉरंटकडून तुमचे फुटेज पोलिसांना उपलब्ध होऊ शकतात. कोणतीही अनुचित घटना होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाणार आहे.
मुंबई
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी यांसह ठिकठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्याचा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईकरांच्या संरक्षणासाठी १५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’च्या विरोधात पोलिस विशेष मोहीम राबवणार आहेत. अमंली पदार्थविरोधी विभाग ड्रग्ज विक्रेत्यांच्या हालचालींवरही करडी नजर ठेवली जाणार आहे. New Year Celebration |
पुणे
पुण्यात सरत्या वर्षाला निरोपाच्या पार्टीवर नियंत्रण घालण्यासाठी 3000 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यासोबत ८०० वाहतूक पोलिस कर्मचारी चौका-चौकांमध्ये तैनात असणार आहेत. नववर्षाचे स्वागत करताना मद्यपान करून वाहन चालवल्यास पुणे शहरांतील चौकांमध्ये अशा वाहन चालकांवर पुणे पोलिस विशेष मोहिमेद्वारे कारवाई करणार आहेत.
कोकण
थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. अनेक जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. येथे ठीक ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. New Year Celebration |
हेही वाचा:





