कोल्हापूरात पार्लरवर पोलिसांचा छापा; 3 पीडित महिलांची सुटका

कोल्हापूर – महालक्ष्मी चेंबर्स येथे दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या दृष्टी मसाज पार्लरवर आज शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई करत मसाज पार्लर चालवणाऱ्या महिलेला ताब्यात घेत 3 पीडित महिलांची सुटका केली.
मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्स या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर दृष्टी आयुर्वेद पंचकर्म अँड बोडी केअर या नावाने मसाज सेंटर आहे. गेल्या काही महिन्यांपासून मसाज सेंटरमध्ये बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय सुरू होता.
या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आज दुपारी शाहूपुरी पोलिसांनी या मसाज पार्लरवर छापा टाकला. यावेळी ही महिला मसाज पार्लरच्या नावावर वेश्या व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. शाहूपुरी पोलिसांनी येथून संशयित महिलेला ताब्यात घेत वेश्या व्यवसायास प्रवृत केलेल्या 3 पीडित मुलींची सुटका केली.





