Satara | पोलीस पाटील दीपक गिरी पाटील आदर्श पोलीस पाटील पुरस्कार

सातारा, (प्रतिनिधी) – महसूल व पोलीस प्रशासनातील आदर्श कामगिरीसाठी दिला जाणार यावर्षीचा राज्यपाल आदर्श पोलीस पाटील पुरस्कार अनवडी गावचे पोलीस पाटील दीपक गिरी पाटील यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
राज्य शासनातर्फे महसूल व पोलिस प्रशासनात उठावदार व आदर्श काम केलेल्या पोलीस पाटलांचा गौरव केला जातो. जिल्ह्यातून पहिल्यांदाच राज्यपाल पुरस्कार मिळवण्याचा मान दीपक गिरी पाटील यांना मिळाला.
स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपस्थित होत्या.
दीपक गिरी यांनी महसूल, पोलिस प्रशासन व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची करण्यात आली. वाई तालुक्यात त्यांनी अनवडी या गावांचा कार्यभार उत्कृष्टरीत्या सांभाळला.
कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच गावच्या व विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे योगदान आहे.
आ. मकरंद पाटील, उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, वाईचे प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, नायब तहसीलदार तसेच सपोनि गर्जे,
पोलीस पाटील एकीकरणचे राज्याध्यक्ष प्रविण राक्षे, बबन पाटील, विष्णू लोहार, तालुका उपाध्यक्ष महेश रोकडे, विक्रम भोसले पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले.




