Poland Shooting : पोलंडमध्ये युवकाकडून स्वैर गोळीबार, 6 जण ठार
पोलंडच्या (Poland Shooting) क्राकोव शहरातल्या रहदारीच्या चौकामध्ये कट्टर उजव्या विचारसरणीच्या युवकाने केलेल्या स्वैर गोळीबारामध्ये ६ जण ठार झाले आणि अन्य १५ जण जखमी झाले आहेत.

Poland Shooting : पोलंडच्या (Poland Shooting) क्राकोव शहरातल्या रहदारीच्या चौकामध्ये कट्टर उजव्या विचारसरणीच्या युवकाने केलेल्या स्वैर गोळीबारामध्ये ६ जण ठार झाले आणि अन्य १५ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा २४ वर्षीय हल्लेखोर जखमी झाला. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
या स्वैर गोळीबाराच्या घटनेनंतर देशभर दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. हा हल्ला दहशतवादी कृती असल्याचे पोलंडच्या (Poland Shooting) संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. शनिवारी पोलंडमधील दुसऱ्या क्रमांकाच्या क्राकोव शहरातल्या ओल्ड टाऊन नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या रहदारीच्या चौकामध्ये हल्लेखोर युवकाने भरधाव कार घुसवली आणि स्वैर गोळीबार करायला सुरुवात केली.
या हल्ल्यात एकूण ४ महिला आणि २ पुरुष असे ६ जण ठार झाले आणि १५ जखमी झाले. ठार झालेल्यांमध्ये तिघे पोलंड, किरगीझ नागरिक आहेत. याशिवाय ब्रिटनचा एक पुरुष आणि नागरिकत्व समजू न शकलेल्या एका महिलेचाही मृत्यू झाला आहे. या हल्लेखोरांला नंतर दोन पोलिसांनी गोळी घालून जखमी केले. हे दोघेही गोळीबारात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर जखमी झालेल्यांमध्ये ब्रिटन, पोर्तुगाल, रशिया, जर्मनी आणि ऑस्ट्रीयाचे नागरिक असलेले अन्य पाच विदेशी नागरिकांचा समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या (Poland Shooting) कटामध्ये पोलीस अधिकारीही सामील असल्याचा संशय आहे. क्राकोवपासून १५० किलोमीटर लांब असलेल्या हल्लेखोराच्या घरी त्याची पहिण आणि पालकही मृतावस्थेत आढळले आहेत. या हल्ल्यामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.






