Poisonous liquor: विषारी दारूप्रकरणी ९ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र
Poisonous liquor:

मोक्का न्यायालयात सीआयडीकडून कार्यवाही; एका फरार आरोपीचा शोध सुरू
Poisonous liquor: हडपसर आणि दापोडी येथे मेथेनॉलमिश्रित विषारी दारू प्यायल्याने २२ जणांचा मृत्यू झालेल्या प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केलेल्या नऊ आरोपींविरुद्ध बुधवारी मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणातील एका फरार संशयिताचा शोध सुरू असून, त्याला पकडण्यासाठी सीआयडीने विशेष पथक नियुक्त केले आहे.
हडपसर आाणि दापोडी परिसरात २६ ते २८ मे दरम्यान विषारी दारू प्यायल्याने २२ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुरुवातीला हडपसर आणि दापोडी पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने तपास सीआयडीकडे सोपविला.
सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या नऊ आरोपींसह फरार संशयिताविरुद्धही मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
अवैध पुरवठा साखळीचा पर्दाफाश Poisonous liquor:
तपासात उरुळी कांचन येथील राधेश्याम प्रजापती याच्याकडून अवैध दारू आणली जात होती. योगेश रामचंद्र व्हणकाडे ऊर्फ सिकंदर राठोड हा त्यात मेथेनॉल मिसळत होता. त्यानंतर स्थानिक विक्रेत्यांमार्फत या दारूविक्री केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मेथेनॉलचा पुरवठा भिवंडी येथील एका कंपनीच्या गोदामातून मध्यस्थामार्फत केला जात असल्याचेही तपासात समोर आले. त्यानुसार सीआयडीने भिवंडीतील गोदामासह नवी मुंबईतील कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकून कंपनीचे मालक अरुण चौबे (५९) आणि त्यांचा मुलगा अभिषेक (३४) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील पुरवठा साखळीशी संबंधित अन्य आरोपींनाही अटक केली आहे.
टोळीप्रमुखावरही मोक्का Poisonous liquor:
या प्रकरणात ऑगस्ट २०२६ मध्ये मोक्काची कलमे लावण्यात आली. दत्ता ऊर्फ भाऊ लोंढे हा अवैध दारूचे उत्पादन, वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीचा प्रमुख असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लोंढे याला सीआयडीने अटक केली असल्याचे रामानंद यांनी सांगितले.





