बाणेरमध्ये पीएनजी एक्सक्लूसिव्हचे भव्य फ्लॅगशिप दालन; सिग्नेचर दागिन्यांचे कलेक्शन आणि खास सूट योजनांचा धमाका!

पुणे – श्रीराम नवमीच्या पवित्र मुहूर्तावर पुण्यातील बाणेर येथे पीएनजी एक्सक्लूसिव्हच्या नव्या फ्लॅगशिप दालनाचे थाटामाटात उद्घाटन झाले. या शानदार सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उद्घाटन केले. यावेळी पीएनजी एक्सक्लूसिव्हचे संस्थापक अभय गाडगीळ आणि दीपा गाडगीळ, त्यांच्यासोबत ईशा गाडगीळ, अखिल गाडगीळ आणि रणजीत ओक यांची उपस्थिती होती.
दालनाची खासियत-
बाणेरमधील बालेवाडी हायस्ट्रीटजवळ, पंजाब नॅशनल बँकेच्या शेजारी रानडे कॅपिटल इमारतीत हे नवे दालन आहे. पुण्याच्या आयटी हब परिसरात वसलेले हे दालन तब्बल ६,००० चौरस फुटांचे असून, त्याची आकर्षक रचना ग्राहकांना खरेदीचा आनंद द्विगुणित करणारी आहे. पीएनजी एक्सक्लूसिव्हच्या नावाला साजेसे हे दालन सिग्नेचर दागिन्यांचे खास कलेक्शन घेऊन आले आहे. येथे सोन्या-चांदीच्या वैविध्यपूर्ण दागिन्यांबरोबरच चांदीच्या रॉयल अँटिक वस्तू आणि गिफ्ट आयटम्स उपलब्ध आहेत. फॅशन, डेलीवेअर, वेडिंग आणि ऑकेजन वेअरसाठी खास दागिन्यांचे संग्रह येथे मिळतील. विशेष म्हणजे, फॅन्सी सिल्व्हर ज्वेलरीच्या असंख्य डिझाइन्सही ग्राहकांना खुश करणार आहेत.
प्रीमियम सुविधा-
या भव्य दालनात लग्नाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांच्या खरेदीसाठी एक खास प्रीमियम लाउंजची व्यवस्था आहे. ग्राहकांना आरामदायी आणि निवांत वातावरणात खरेदीचा अनुभव घेता यावा, यासाठी ही सोय करण्यात आली आहे. अधिक माहिती किंवा चौकशीसाठी सुवर्णा ठाकूर यांच्याशी ९२२५१७६२३१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
घडणावळीवर फ्लॅट सूट-
बाणेर दालनाच्या उद्घाटनानिमित्त पीएनजी एक्सक्लूसिव्हने ग्राहकांसाठी आकर्षक सूट योजनांची घोषणा केली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ३०% फ्लॅट सूट, हिऱ्याच्या दागिन्यांवर तब्बल १००% सूट, चांदीच्या दागिन्यांवर २५% सूट आणि चांदीच्या वस्तूंवर २०% फ्लॅट सूट देण्यात येणार आहे. याशिवाय, ‘विनाघट योजना’ अंतर्गत जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ही योजना ६ एप्रिल ते ४ मे २०२५ पर्यंत सुरू राहील. या ऑफरचा लाभ बाणेर दालनाबरोबरच एरंडवणे (नळ स्टॉप, निसर्ग हॉटेल लेन) आणि गोव्यातील पणजी (कामत एलिट, संत ईनेझ मार्ग) येथील दालनांमध्येही घेता येईल. योजनेच्या नियम आणि अटी संस्थेकडे राखीव आहेत.
ग्राहकांसाठी पर्वणी-
पुण्याच्या मध्यवर्ती आयटी हबमध्ये उभे राहिलेले हे दालन ग्राहकांना प्रीमियम खरेदीचा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. सिग्नेचर कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि उत्तम सुविधांसह पीएनजी एक्सक्लूसिव्हने बाणेरमध्ये आपले पाय रोवले असून, ही ग्राहकांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.





