PMRDA निवडणुक: प्रियांका मांगडे-पठारे 7400 मतांनी विजयी

वेल्हे – पुणे महानगर नियोजन समिती (पीएमआरडीए) च्या निवडणुकीत विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना धक्का देत भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकहाती विजय संपादित केला. वेल्ह्यातील प्रियांका सागर मांगडे- पठारे या ग्रामीण मतदार संघातून जिल्ह्यात सर्वाधिक 7400 मते घेऊन विजयी झाल्या.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी सर्वांना एकत्र घेऊन तीनही तालुक्यात निवडणूक प्रचार यंत्रणेचे नियोजन केले होते. हा विजय येथे केलेल्या विकासकामांचा व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे व किरण राऊत यांनी सांगितले. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – प्रियांका मांगडे-पठारे (वेल्हा – राष्ट्रवादी), वसंत भसे (खेड – राष्ट्रवादी), सुखदेव तापकीर (मुळशी – राष्ट्रवादी), दीपाली हुलावळे (मावळ – राष्ट्रवादी), स्वप्नील उंद्रे (हवेली – बीजेपी) यशवंत गव्हाणे (शिरूर – अपक्ष), कुलदीप बोडके (मावळ – बीजेपी).





