PMC Election: विश्वास विकासाचा, साथ जनतेची! अर्चना पाटील यांच्या रॅलीला जोरदार प्रतिसाद

पुणे – गेल्या आठ वर्षांत रस्ते, पाणी, आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी केलेले काम पाहता, नागरिकांनी त्यांना पुन्हा निवडून देण्याचा निर्धार केल्याचा आपल्याला विश्वास असल्याच्या भावना प्रभाग क्रमांक २२ क मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार अर्चना पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
पाटील यांच्या प्रचारार्थ लोहियानगर परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. या वेळी प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ही गर्दी पाहता मतदार आपल्या पाठीशी असल्याचा दावाही या वेळी पाटील यांनी केला. लोहियानगरमधील श्रीराम मंदिरापासून या पदयात्रेला सुरुवात झाली. त्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी फुलांची उधळण करत आपले प्रेम व्यक्त केले. अतिशय शिस्तबद्ध आणि भव्य अशा या रॅलीने प्रभागातील वातावरण भाजपमय झाल्याचे पाहायला मिळाले.
“आजचा हा प्रतिसाद म्हणजे माझ्या ८ वर्षांच्या तपश्चर्येचे फळ आहे. सर्व जाती- धर्माच्या लोकांना सोबत घेऊन केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. या विश्वासाने मला काम करण्याची नवी प्रेरणा दिली असून, मी शब्द देते, की पुढच्या टर्ममध्येही मी जनतेची सेवा अशीच अविरत आणि जोमाने करत राहीन.”
– अर्चना तुषार पाटील, भाजप उमेदवार



