PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि महाराष्ट्र दौऱ्यावर; Gen-Zसोबत थेट साधणार संवाद
PM Narendra Modi : ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 (GFF) या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
याशिवाय ते गुजरातमधील कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान ३५,००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करतील आणि ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’चे उद्घाटन करतील.
आज दुपारी 12 वाजता वडोदरा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. यानंतर आज सायंकाळी ५.४५ वाजता मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६चे उद्घाटन करण्यात येणार आहे.
एका अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी सर्वात आधी वडोदरा येथे भेट देतील, जिथे ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. या प्रसंगी ते सभेला संबोधितही करतील. यामध्ये पंतप्रधान मोदींचा ‘जेन-जी’ (Gen-Z) युवा पिढीशी थेट संवाद देखील होणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी ७०० मीटर लांब रेड कार्पेट स्टेज देखील तयार करण्यात आला आहे.
पंतप्रधान जे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील, त्यात २०,७०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाने विकसित केलेल्या ‘वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’ (WDFC) च्या ३२६ किलोमीटर लांबीच्या तीन महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे. यामध्ये साणंद (उत्तर)-मकरपुरा, न्यू उमरेगाव-न्यू सफाळे आणि न्यू सफाळे-जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (JNPA) या भागांचा समावेश आहे.
Will be attending programmes in Vadodara, Navsari and Mumbai tomorrow, 8th September.
These include:
Key projects worth over Rs. 35,000 crore to be inaugurated or to have their foundation stones laid.
Dedication of three important sections of the Western Dedicated Freight…
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2026
तीन रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी
पंतप्रधान मोदी ३२९ किलोमीटर लांबीच्या आणि ९,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या तीन रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करतील. यामध्ये वडोदरा-रतलाम तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन, मियागाम करजण-चोरांडा-मालसर गेज परिवर्तन प्रकल्प आणि विश्वामित्री-दभोई रेल्वे लाईन दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. याशिवाय सुमारे १,७८० कोटी रुपये खर्चाच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचीही ते पायाभरणी करतील.
मालगाडी सेवांना दाखवणार हिरवा झेंडा
पंतप्रधान न्यू साणंद (उत्तर), न्यू मकरपुरा, न्यू उमरेगाव आणि मुंबईच्या न्यू जेएनपीटी येथून मालगाडी सेवांना हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय, ते वडोदरा आणि तांडा रोड दरम्यान नवीन रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवतील, ज्याचा फायदा वडोदरा, छोटा उदेपूर आणि अलिराजपूर जिल्ह्यांतील लोकांना होईल. PM Narendra Modi
GFF-2026 चे उद्घाटन करतील पंतप्रधान मोदी
तसेच पंतप्रधान मुंबईत ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ (GFF) २०२६ चे उद्घाटन करतील. आर्थिक तंत्रज्ञानाशी संबंधित जगातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली वार्षिक परिषदांपैकी ही एक आहे.’ग्लोबल फिनटेक फेस्ट’ची सातवी आवृत्ती ८ ते ११ सप्टेंबर दरम्यान आयोजित केली जात आहे. २०२० पासून GFF हा असा एक आंतरराष्ट्रीय मंच म्हणून उदयास आला आहे, जिथे धोरणकर्ते, नियामक, मध्यवर्ती बँका, आर्थिक संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ज्ञ आणि इतर जागतिक भागधारक वित्त क्षेत्राच्या भविष्याला आकार देण्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतात. PM Narendra Modi
हेही वाचा:





