PM Modi’s Indonesia Visit : भारत इंडोनेशियाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्रे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या दरम्यानच्या चर्चेनंतर (PM Modi's Indonesia Visit) भारताने इंडोनेशियाला ब्रह्मोस क्षेपणास्त्रे पुरवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

PM Modi’s Indonesia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या दरम्यानच्या चर्चेनंतर (PM Modi’s Indonesia Visit) भारताने इंडोनेशियाला ब्रह्मोस क्षेपणास्त्रे पुरवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र दिल्यामुळे इंडोनेशियाची सागरी सुरक्षा अधिक बळकट केली जाईल.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान मिळालेल्या यशानंतर इंडोनेशियाने (PM Modi’s Indonesia Visit) भारताची हवेतून हवेत मारा करणारी अस्त्र क्षेपणास्त्रे आयात करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळते आहे. दोन्ही देश आपले संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने सहकार्य वाढवणार आहेत.
भारत आणि इंडोनेशिया यांनी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या सबांग बंदराचा संयुक्तपणे विकास करण्यासही सहमती दर्शवली आहे. हे बंदर मलाक्काच्या सामुद्रधुनीवर वसलेले आहे आणि भारताच्या ग्रेट निकोबार बंदर प्रकल्पापासून १०० मैल अंतरावर आहे.
संरक्षणविषयक देवाणघेवाण, आपत्ती व्यवस्थापन आणि औद्योगिक सहकार्य वाढवण्यासाठीचा एक करार, द्विपक्षीय संरक्षण, सुरक्षा आणि सागरी सहकार्य अधिक दृढ करणे, भारताच्या यूपीआयचा इंडोनेशियामध्ये वापर, नील अर्थकारण, सागरी व्यापार आणि बंदर विकासाधील सहकार्याबाबतचे करार देखील करण्यात आले आहेत.
दोन्ही देशांनी २०१८ मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी (PM Modi’s Indonesia Visit) करण्याचा निर्णय घेतला आहे. विकास, सुरक्षा, तंत्रज्ञान, संस्कृती आणि शिक्षण यासारख्या प्रत्येक क्षेत्रात सहकार्याच्या निर्णयांमुळे त्या संबंधांना आज अधिक उंची प्राप्त झाल्याचे पंतप्रधान मोदींनी निवेदनामध्ये सांगितले.






