PM Modi : “काँग्रेसला निरोप देण्याची वेळ जवळ, भाजप 3 डिसेंबरला सत्तेवर येणार”; छत्तीसगडमध्ये पंतप्रधानांचा मोठा दावा

PM Modi in Chhattisgarh: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची राज्यातील मुंगेली याठिकाणी आज सभा पार पडली. दरम्यान, या सभेत पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना,”काँग्रेसच्या निरोपाची वेळआता जवळ आली आहे, छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागणार असून येत्या ३ डिसेंबरला भाजप येथे येणार असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला.
मुंगेलीत आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यता भाजपचेच राज्य येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. तसेच काँग्रेसर सडकून टीका देखील केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात प्रत्येक घरात रोष आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. काँग्रेसचे नेते दिल्लीतून येऊन खोटे बोलतात. तर येत्या देव दिवाळीत काँग्रेस कुठेही दिसणार नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या पराभवाची आता वेळ जवळ आल्याचे म्हटले आहे.
पुढे बोलताना पंतप्रधानांनी,”दिल्लीहून आलेले पत्रकार मला सांगतात की छत्तीसगडचे मुख्यमंत्री स्वतः निवडणूक हरत आहेत. इतकेच नाही तर काँग्रेसच्या जुन्या नेत्याचा विश्वासघात झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी अडीच वर्षांचा करार झाला होता. दिल्लीत बसलेल्या सर्व नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी पैसे देऊन विकत घेतले, आता काँग्रेसचे सरकार काही दिवस राहणार असल्याचे त्यांनी म्हटले,
पंतप्रधान पुढे म्हणाले की, छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार जाण्याची उलटी गिनती सुरू झाली आहे. काँग्रेसला आता क्षणभरही गरज नाही. तुमची तपश्चर्या आम्ही विकास करून परत करू. 3 डिसेंबरला भाजप येथे येणार असून तरुणांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे. पंतप्रधान इथेच थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले की, भाजपने छत्तीसगडची निर्मिती केली. काँग्रेसच्या तिकीट वाटपात खेळ झाला आहे, असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.





