“शेतकऱ्यांपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही” ; डोनाल्ड ट्रम्पचे नाव न घेता टॅरिफवर पंतप्रधानांचे थेट उत्तर

PM Modi on Trump Tariffs। अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफवरून दोन्ही देशांमध्ये सध्या वितुष्ट आल्याचे दिसत आहे. ट्रम्पच्या २५ %टॅरीफची आजपासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. तर अतिरिक्त २५ % टॅरिफ हा २७ तारखेपासून लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच आता अमेरिकेने लागू केलेल्या या टॅरिफवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली येथे एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी सतत काम करत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी देशातील शेतकऱ्यांच्या बाजूने एक मोठे विधान केले आहे. याविषयी त्यांनी,”शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे” असे म्हटले आहे. भारत शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. असे सांगत याची मोठी किंमत मोजावी लागेल हेआपल्याला माहित आहे आणि आपण त्यासाठी तयार आहेत…”असे म्हटले.
“शेतकऱ्यांपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही” PM Modi on Trump Tariffs।
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात सोयाबीन, मोहरी आणि शेंगदाण्याचे उत्पादन विक्रमी पातळीवर वाढले आहे. त्यांनी जोर देऊन सांगितले की, “आमच्यासाठी शेतकऱ्यांचे हित हे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत कधीही आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी तडजोड करणार नाही आणि मला माहित आहे की मला वैयक्तिकरित्या याची मोठी किंमत मोजावी लागेल पण मी त्यासाठी तयार आहे. आज भारत माझ्या देशातील शेतकऱ्यांसाठी, माझ्या देशातील मच्छीमारांसाठी, माझ्या देशातील पशुपालकांसाठी तयार आहे.”
India will never compromise on the interests of its farmers. pic.twitter.com/WExdyvkLRU
— PMO India (@PMOIndia) August 7, 2025
पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीवरील खर्च कमी करणे, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करणे या उद्दिष्टांवर आम्ही सतत काम करत आहोत. आमच्या सरकारने शेतकऱ्यांची ताकद हा देशाच्या प्रगतीचा आधार मानला आहे. म्हणूनच, गेल्या काही वर्षांत बनवलेल्या धोरणांमुळे केवळ मदत झाली नाही तर शेतकऱ्यांमध्ये विश्वास वाढवण्याचा प्रयत्नही झाला. पंतप्रधान सन्मान निधीकडून मिळालेल्या मदतीमुळे लहान शेतकऱ्यांना आत्मविश्वास मिळाला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना धोक्यापासून संरक्षण मिळाले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेद्वारे सिंचनाशी संबंधित समस्या सोडवण्यात आली आहे. लहान शेतकऱ्यांची संघटित शक्ती वाढली आहे. सहकारी आणि स्वयंसहाय्यता गटांना आर्थिक मदत दिल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत झाली आहे. पंतप्रधान किसान संपदा योजनेमुळे नवीन अन्न प्रक्रिया युनिट्स आणि साठवणुकीला गती मिळाली आहे.
शेती आणि दुग्ध क्षेत्राबाबत अमेरिकेची मागणी काय होती? PM Modi on Trump Tariffs।
अमेरिका-भारत व्यापार कराराचा भारतीय शेतकरी आणि दुग्ध उत्पादकांच्या हितावर गंभीर परिणाम होत होता. कारण अमेरिकेने भारतीय कृषी आणि दुग्ध बाजारपेठांमध्ये त्यांच्या उत्पादनांना व्यापक प्रवेश मिळावा अशी मागणी केली होती. अमेरिकेची इच्छा होती की भारताने त्यांचे उच्च शुल्क (२०-१००%) आणि नॉन-टॅरिफ अडथळे दूर करावेत, जेणेकरून सफरचंद, बदाम, अक्रोड आणि अनुवांशिकरित्या सुधारित पिके सोयाबीन आणि मका यांसारखी अमेरिकन कृषी उत्पादने कोणत्याही अडथळ्याशिवाय भारतीय बाजारपेठेत पोहोचू शकतील.
यासोबतच, अमेरिका दुग्धजन्य पदार्थांसाठी, विशेषतः चीज आणि दुग्धपान पावडरसाठी बाजारपेठ उघडण्याची मागणी करत होती, जी भारतातील ८ कोटी दुग्ध उत्पादकांसाठी धोक्याची होती. अमेरिकन दुग्धजन्य पदार्थ हा भारतात धार्मिकदृष्ट्या संवेदनशील मुद्दा आहे. कारण अमेरिकेत गायींना अन्न म्हणून मांस आणि मांस उत्पादने दिली जातात.
भारताने या मागण्यांना जोरदार विरोध केला. यामुळे केवळ धार्मिक संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित झाला नसता, तर दुग्धजन्य पदार्थ बाजार उघडल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे जीवनमानही धोक्यात येऊ शकते. अमेरिकन दुग्धजन्य पदार्थ स्वस्त आहेत आणि भारतीय शेतकरी आधीच कमी उत्पन्न आणि जागतिक स्पर्धेशी झुंजत आहेत. अमेरिकेच्या मागण्या मान्य करून, या दुग्ध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीत अडचणी येऊ शकल्या असत्या. म्हणूनच भारताने अमेरिकेला औद्योगिक वस्तू आणि संरक्षण खरेदीमध्ये सवलती दिल्या परंतु शेती आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये सवलती देण्यास नकार दिला. यानंतर, संतप्त ट्रम्प यांनी भारतावर दोनदा ५० टक्के शुल्क लादले आहे.





