“काँग्रेसने आंबेडकरांचा वारसा पुसण्याचा प्रयत्न केला” ; विरोधकांच्या गदारोळावर पंतप्रधान मोदींचा पलटवार

PM Modi On Congress । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून देशातील राजकारण तापले आहे. या मुद्द्यावर काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी भाजपने माफी मागावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “आंबेडकरांचा केलेला अपमान काँग्रेस लपवू शकत नाही. एका घराणेशाहीच्या नेतृत्वाखालील पक्षाने आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्याची खेळी केली आहे.”असे म्हटले आहे.
‘आंबेडकरांचा वारसा पुसण्याचा काँग्रेसचा प्रयत्न’ PM Modi On Congress ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला उत्तर देताना सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी “डॉ. आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी आणि एससी/एसटी समुदायांना अपमानित करण्यासाठी घराणेशाहीच्या नेतृत्वाखालील पक्षाने प्रत्येक संभाव्य घाणेरडी युक्ती कशी खेळली हे भारतातील जनतेने वेळोवेळी पाहिले आहे. काँग्रेसने दोनदा बाबासाहेब आंबेडकरांना निवडणूकीत हरवण्याचा प्रयन्त केला. पंडित नेहरूंनी त्यांच्या विरोधात प्रचार केला असल्याचे जाहीर केले आहे. आणि त्यांचा पराभव हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवून त्यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये स्थान देण्यास नकार दिला.” असे म्हटले आहे.
If the Congress and its rotten ecosystem think their malicious lies can hide their misdeeds of several years, especially their insult towards Dr. Ambedkar, they are gravely mistaken!
The people of India have seen time and again how one Party, led by one dynasty, has indulged in…
— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2024
पुढे पंतप्रधानांनी काँग्रेसवर निशाणा साधताना, “संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. आंबेडकरांचा अपमान करण्याचा आणि एससी/एसटी समुदायांकडे दुर्लक्ष केल्याचा काँग्रेसचा काळा इतिहास उघडकीस आणला. त्यांनी मांडलेल्या तथ्यांमुळे काँग्रेस घाबरली आहे आणि त्यामुळे ती आता ढोंग करत आहे.”
अमित शहां नेमकं काय म्हणाले ? PM Modi On Congress ।
संसदेत, गृहमंत्री अमित शाह देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजीनाम्याचा संदर्भ देत होते. काँग्रेसकडे बोट दाखवत त्यांनी विचारले की, “आंबेडकरांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला? ते म्हणाले, आता तुम्ही आंबेडकरांचे नाव शंभरहून अधिक वेळा घेतले तरी आंबेडकरांप्रती तुमच्या भावना काय आहेत ते सांगतील.” तसेच आंबेडकरांचे नाव घेणं हि एक आता फॅशन झाली आहे. आंबेडकर आंबेडकर नाव घेण्यापेक्षा देवाचे नाव घेतले असते तर पुढचे सात जन्म तुम्हाला स्वर्गात स्थान मिळाले असते” असे वक्तव्य शाह यांनी यावेळी केले.





