पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाला रवाना ; सर्वात श्रीमंत मुस्लिम देशात जाण्याचा अजेंडा काय ? वाचा

PM Modi Jeddah Visit। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाला रवाना झाले. ते दोन दिवस जेद्दाहमध्ये असणार आहेत. पंतप्रधान मोदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेणार आहेत. या दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या चर्चेचा अजेंडा काय असेल ते देखील त्यांनी यातून सांगितले. भारत आणि सौदी अरेबिया अनेक करारांवर स्वाक्षरी करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरएक पोस्ट शेअर करत , “मी सौदी अरेबियातील जेद्दाहला जात आहे. मी याठिकाणी अनेक बैठका आणि कार्यक्रमांना उपस्थित राहीन. भारत सौदी अरेबियासोबतच्या आपल्या ऐतिहासिक संबंधांना महत्त्व देतो. गेल्या दशकात द्विपक्षीय संबंधांना बरीच गती मिळाली आहे. मी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिलच्या दुसऱ्या बैठकीत सहभागी होण्यास उत्सुक आहे. मी तेथील भारतीय समुदायाशीही संवाद साधेन.”असे म्हटले आहे.
Leaving for Jeddah, Saudi Arabia, where I will be attending various meetings and programmes. India values our historic relations with Saudi Arabia. Bilateral ties have gained significant momentum in the last decade. I look forward to participating in the 2nd Meeting of the…
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2025
भारत आणि सौदी अरेबियामध्ये अनेक करार होऊ शकतात PM Modi Jeddah Visit।
पंतप्रधान मोदींचा सौदी अरेबिया दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा असणार आहे.एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, “भारत आणि सौदी अरेबियामध्ये सहा करारांवर स्वाक्षरी होऊ शकते. यामध्ये भारतीय हज यात्रेकरूंच्या कोट्यासह इतर मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
पंतप्रधान मोदींचे हे संपूर्ण वेळापत्रक असेल PM Modi Jeddah Visit।
सौदी अरेबियातील जेद्दाह याठिकाणी पोहोचल्यानंतर, पंतप्रधान मोदी संध्याकाळी ७.०० वाजता (सौदी वेळेनुसार ४.३० वाजता) भारतीय समुदायाशी संवाद साधतील. यानंतर, पंतप्रधान मोदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतील. ते रात्री ८ वाजता (सौदी अरेबियाच्या वेळेनुसार संध्याकाळी ५.३० वाजता) रॉयल पॅलेसमध्ये असतील.
२०२५ मध्ये हज यात्रेकरूंचा कोटा वाढला –
२०१४ मध्ये भारताचा हज कोटा १३६,०२० होता, जो २०२५ मध्ये वाढवून १७५,०२५ करण्यात आला. यापैकी १२२,५१८ प्रवासी हज समितीमार्फत जातात. तर ५२,५०७ प्रवासी खाजगी टूर ऑपरेटरकडे जातात. सौदी अरेबियाने खाजगी ऑपरेटर्सचा कोटा ८० टक्क्यांनी कमी केला होता. परंतु भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर, १०,००० अतिरिक्त व्हिसा पुनर्संचयित करण्यात आले.





