पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वात उंच पुलाचे केले उद्घाटन ; पुलावर हातात तिरंगा घेऊन चालले

PM Modi Jammu Visit । पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. ज्याठिकाणी त्यांनी चिनाब पूल आणि अंजनी पुलाचे उद्घाटन केले. काही वेळातच, पंतप्रधान कटरा-श्रीनगर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा देखील दाखवणार आहेत. जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज, चिनाब ब्रिज, काश्मीर खोऱ्याला उर्वरित भारताशी सर्व हवामानात रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि कटरा-श्रीनगर प्रवासाचा वेळ कमी करेल.
पहलगमनंतर मोदींचा पहिलाच दौरा PM Modi Jammu Visit ।
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. या ठिकाणी ते ४६ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प जम्मू – काश्मीरला भेट देण्यासाठी आले आहेत. या उपक्रमामुळे कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि ‘दिल की दूरी आणि दिल्ली की दूरी’ कमी होईल, असे सांगण्यात आले. या दौऱ्यामुळे या प्रदेशात पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.
#WATCH | J&K: Prime Minister Narendra Modi waves the Tiranga as he inaugurates Chenab bridge – the world’s highest railway arch bridge.#KashmirOnTrack
(Video: DD) pic.twitter.com/xfBnSRUQV5
— ANI (@ANI) June 6, 2025
पंतप्रधानांनी चिनाब पूल आणि अंजी पुलाचे उद्घाटन केले. हा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याअंतर्गत हा पूल काश्मीर खोऱ्याला उर्वरित भारताशी जोडेल, प्रवासाचा वेळ सुमारे 3 तासांपर्यंत कमी करेल आणि या प्रदेशात व्यापार आणि पर्यटनाला चालना देईल. PM Modi Jammu Visit ।
दरम्यान , यूएसबीआरएल (उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक) प्रकल्पावरील प्रदर्शनाला भेट देताना पंतप्रधान मोदी यांच्यासह जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी प्रकल्पावर काम करणाऱ्या लोकांशीही संवाद साधला.
हेही वाचा
“पाकिस्तानच्या मानगुटीवर द्विराष्ट्र सिद्धांताचे भूत” ; मोहन भागवतांनी पाकला म्हटले ‘दुट्टप्पी देश’





