Asian Champions Trophy 2024 : हॉकी इंडियाचा विजयी चौकार, दक्षिण कोरियला चारली पराभवाची धूळ…

Asian Champions Trophy 2024 : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. भारताने दक्षिण कोरियाचा 3-1 असा पराभव करत स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवला. भारताकडून अरिजित सिंग हुंदलने एक (8′) तर कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल(9′,43′) केले. हरमनप्रीतचे दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवरून झाले तर अरिजितने मैदानी गोल केला.
आता भारतीय हॉकी संघ 14 सप्टेंबरला शेवटच्या राऊंड रॉबिन सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तानशी भिडणार आहे. दरम्यान, भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान आधीचे निश्चित केले आहे. याआधी टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात यजमान चीनचा 3-0 असा तर दुसऱ्या सामन्यात जपानचा 5-1 असा पराभव केला होता. तर तिसऱ्या सामन्यात भारतानं मलेशियाचा 8-1 ने धुव्वा उडवत विजयाची नोंद केली होती.
India passes the Korean test with flying numbers🥳
Araijeet Singh Hundal scored the opening goal followed by Harmanpreet’s Penalty Corner’s.
We are into the Semi-Finals🥳India 🇮🇳 3-1 🇰🇷 Korea
Next up is the last match of our group stage against Pakistan on Saturday at 1:15… pic.twitter.com/mYaePXrWHm
— Hockey India (@TheHockeyIndia) September 12, 2024
असा झाला सामना….
भारताने सामन्याच्या 8व्या मिनिटाला अरिजित सिंग हुंदलच्या गोलने आपले खाते उघडले आणि त्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला हरमनप्रीत सिंगच्या पेनल्टी कॉर्नरने आघाडी दुप्पट केली. यानंतर 30व्या मिनिटाला कोरियाने पलटवार केला. कोरयाकडून यांगने गोल केला. पहिल्या हाफपर्यंत भारत 2-1 ने आघाडीवर होता. उत्तरार्धात हरमनप्रीतने आणखी एक गोल केला आणि भारताची आघाडी 3-1 अशी केली. ही आघाडी सामना संपेपर्यंत कायम राहिली आणि भारताने सलग चौथा विजय मिळवला.
Asian Champions Trophy 2024 : मलेशियाला पराभवाची धूळ चारत टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक…
मलेशियाची जपानवर मात….
याआधीच्या सामन्यात गुरुवारी मलेशियाने जपानविरुद्ध 5-4 असा विजय मिळवला होता. सय्यद चोलन (12′, 40′), नॉर्स्याफिक सुमंत्री (21′), सियारामन मॅट (47′) आणि कमाल अबू अझराई (48′) यांच्या गोलच्या जोरावर मलेशियाने विजय मिळवला आणि गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले . बुधवारी त्यांच्या मागील सामन्यात भारताकडून 1-8 ने पराभूत झाल्यानंतर गुणतालिकेत तळाशी असलेल्या मलेशियाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोणत्याही किंमतीवर विजय मिळवणे आवश्यक होते आणि त्यांनी जपानविरूध्द सामना जिंकत आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत.





