पंतप्रधान मोदी अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा ; दहशतवाद,ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर चर्चा

PM Modi Donald Trump । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या संभाषणाची माहिती दिली. याविषयी माहिती देताना, “पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्याशी चर्चा केली.” असे म्हणाले. तर या फोनवरील चर्चेविषयी बोलताना मोदी यांनी,”ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू आहे. ” असे ,म्हणाले. कॅनडामध्ये होणाऱ्या G-7 शिखर परिषदेदरम्यान ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटणार होते, परंतु ट्रम्प लवकर निघून गेले. याच कारणामुळे दोघांनीही फोनवर बोलणे केले.
संभाषणादरम्यान मोदींनी ट्रम्प यांना भारत भेट देण्याचा आग्रह केला. तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी,”आपण भारत भेट देण्यास उत्सुक आहोत” असे म्हटले. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तब्बल ३५ मिनिटे चर्चा केली. २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोनवरून शोक व्यक्त केला होता आणि दहशतवादाविरुद्ध पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच चर्चा होती. म्हणून ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर चर्चा झाली.
व्यापार करारामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी PM Modi Donald Trump ।
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी याविषयी बोलताना, “पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात सांगितले की या संपूर्ण प्रकरणात कधीही, कोणत्याही स्तरावर, भारत-अमेरिका व्यापार करार किंवा भारत आणि पाकिस्तानमधील अमेरिकेच्या मध्यस्थीसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही.” असे त्यांनी यावेळी सांगितले. लष्करी कारवाई थांबवण्याबाबत भारत आणि पाकिस्तानमध्ये थेट चर्चा झाली, दोन्ही सैन्यांमधील विद्यमान माध्यमांद्वारे आणि पाकिस्तानच्या विनंतीवरूनच हा निर्णय घेण्यात आला.
दहशतवादाविरुद्ध ट्रम्प यांचा भारताला पाठिंबा
पंतप्रधान मोदींनी यावर भर दिला की, भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही, कधीही करत नाही आणि कधीही करणार नाही. या मुद्द्यावर भारतात पूर्ण राजकीय एकमत आहे”. पंतप्रधानांनी मांडलेले मुद्दे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सविस्तरपणे समजून घेतले आणि दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईला पाठिंबा दर्शवला.
भारत गोळ्यांचे उत्तर गोळ्यांनी देईल : मोदी
मोदींनी ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, २२ एप्रिलनंतर भारताने दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्याचा आपला निर्धार संपूर्ण जगाला कळवला आहे. ते म्हणाले की, ६-७ मे च्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील फक्त दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला होता. भारताने हे देखील स्पष्ट केले होते की ते पाकिस्तानच्या गोळ्यांना गोळ्यांनी उत्तर देईल.
जेडी व्हान्स यांचा पंतप्रधान मोदींना फोन PM Modi Donald Trump ।
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी ९ मे च्या रात्री पंतप्रधान मोदींना फोन केला. व्हान्स म्हणाले होते की पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करू शकतो. जर असे झाले तर भारत पाकिस्तानला आणखी मोठे उत्तर देईल, असे मोदींनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले. ९-१० मे च्या रात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान केले.





