लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानंतर पंतप्रधान आज मोठा निर्णय घेणार? ; सीसीएसची आज महत्वपूर्ण बैठक

PM Modi Cabinet Panel Meet । जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज पार पडणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतेक पर्यटक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ११ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. यासोबतच आज सुरक्षा व्यवहार समिती सीसीएसची बैठकही होणार आहे.ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची एकही बैठक झाली नाही. फक्त २३ एप्रिल रोजी सुरक्षा विषयक कॅबिनेट समिती (CCS) ची बैठक झाली. ज्यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. गेल्या बुधवारी झालेल्या सीसीएस बैठकीनंतर भारताने पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध कमी करण्यासह अनेक पावले उचलण्याची घोषणा केली होती.
पंतप्रधान मोदींकडून लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य PM Modi Cabinet Panel Meet ।
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांनी दहशतवादाविरुद्ध ‘जोरदार प्रहार’ करण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत पंतप्रधान मोदींनी ‘ही’ मोठी गोष्ट सांगितली
पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत सांगितले की, दहशतवादावर जोरदार हल्ला करणे हा आपला राष्ट्रीय संकल्प आहे. भारतीय सशस्त्र दलांच्या व्यावसायिक क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “आमच्या प्रतिसादाची पद्धत, उद्दिष्टे आणि वेळ ठरवण्याचे त्यांना पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य आहे. पंतप्रधान मोदींनी आधीच सांगितले आहे की दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना असे परिणाम भोगावे लागतील ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल.”
पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराचे जवान हाय अलर्टवर PM Modi Cabinet Panel Meet ।
पहलगाम हल्ल्यानंतर, सशस्त्र दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील विशिष्ट तुकड्यांना ऑपरेशनल रेडीनेस मोडमध्ये ठेवण्यात आले आहे. ड्रोन, उपग्रह प्रतिमा आणि इलेक्ट्रॉनिक इंटरसेप्टद्वारे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी लाँचपॅडवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
हेही वाचा
पाकिस्तानची झोप उडाली ; मध्यरात्री पत्रकार परिषद घेत सूचना मंत्री म्हणाले, “येत्या २४ तासात भारत…”





