पाकिस्तानची झोप उडाली ; मध्यरात्री पत्रकार परिषद घेत सूचना मंत्री म्हणाले, “येत्या २४ तासात भारत…”

Ataullah Tarar। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. काल पंतप्रधान मोदींनी तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीत लष्काराला मोकळीक देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तर या बैठकीचा धसका पाकिस्तानने घेतला असल्याचे दिसून आले. कारण पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी रात्री उशिरा १:३० च्या सुमारास पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी “आम्हाला विश्वसनीय गुप्तचर माहिती मिळाली आहे, जी सूचित करते की भारत पुढील २४ ते ३६ तासांत लष्करी हल्ला करू शकतो” असा मोठा दावा केला आहे.
भारत पाकविरुद्ध लष्करी कारवाई करणार Ataullah Tarar।
अताउल्लाह तरार यांनी यासंबंधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ,”आमच्याकडे विश्वासार्ह गुप्तचर माहिती आहे की भारत पुढील २४-३६ तासांत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करू शकतो” असा दावा केला आहे. तसेच माहिती मंत्री तरार यांनी भारतावर आरोप करत कोणत्याही निष्पक्ष तपासाऐवजी भारताने थेट लष्करी मार्ग स्वीकारण्याची तयारी केली आहे, जो प्रादेशिक शांततेसाठी घातक ठरू शकतो” असेदेखील म्हटले आहे. तरार यांच्या मते, पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मदतीने या प्रकरणाची निष्पक्ष, स्वतंत्र चौकशी करण्याची ऑफर दिली आहे. मात्र, भारताने हे मान्य केले नाही आणि संघर्षाचा मार्ग निवडला आहे” अशी माहिती देखील आपल्या पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
Pakistan has credible intelligence that India intends carrying out military action against Pakistan in the next 24-36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pahalgam incident.
Indian self assumed hubristic role of Judge, Jury and… pic.twitter.com/WVW6yhxTJ0— Attaullah Tarar (@TararAttaullah) April 29, 2025
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनीही एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीनुसार,”आम्ही हाय अलर्टवर आहोत आणि जर भारताने हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. देशाच्या अस्तित्वाला थेट धोका असेल तरच अण्वस्त्रांचा वापर केला जाईल, “असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदींनी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका निवेदनात स्पष्ट केले की, आमचे सशस्त्र दल दहशतवाद्यांचा नायनाट करण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहेत. याआधी भारताने अनेक मोठे निर्णय घेतले, ज्यामुळे शेजारील देशात घबराट निर्माण झाली. या क्रमाने, भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच व्हिसा रद्द करण्यात आला आहे.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला Ataullah Tarar।
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे एक भयानक दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी संघटनांना जबाबदार धरले आहे, तर पाकिस्तानने हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे.





