पुणे जिल्हा | बाल विवाह रोखण्यासाठी बहिरवाडी ग्रामस्थांची प्रतिज्ञा

परिंचे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील 15 ग्रामपंचायत व परिसरातील शाळांना बरोबर घेऊन कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्था बाल विवाह मुक्त भारत हे अभियान राबविण्यात येत आहे.
गावपातळीवर बाल विवाह रोखण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञा घेऊन प्रयत्न करणार असल्याचे बहिरवाडीतील ग्रामस्थांनी सांगितले.
बहिरवाडी येथे कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्था माध्यमातून बाल विवाह रोखण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीसाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनिल गळंगे, रुपाली गळंगे, अंगणवाडी सेविका अलका वाशीलकर, आशा सेविका सुनिता ढगारे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्प प्रमुख दीपक त्रिपाठी म्हणाले की, समाजातील शोषित, वंचित आणि दुर्बल घटकातील मुले व कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांच्या निवारण करण्याचा प्रयत्न संस्था करत असून गेल्या 34 वर्षांपासून योग्य हस्तक्षेप करीत 20 लाखांपेक्षा अधिक व्यक्तींचे जीवन प्रभावित केले आहे.
भारतातील बालकांच्या हक्कांसाठी अॅक्सेस टू जस्टीस हा प्रकल्प देश पातळीवर राबविला जात आहे. बालविवाह मुक्त भारत, बाल तस्करी, बालमजुरी प्रतिबंध आणि बाल लैंगिक शोषण प्रतिबंध या विषयाला अनुसरून प्रकल्पात बालकांच्या हक्कांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
कैलास सत्यार्थी चील्ड्रन्स फौंडेशन यांच्या सहकार्याने पूर्ण भारतामध्ये तसेच पुणे जिल्हा प्रशाशन यांच्या सहयोगाने कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्थाच्या वतीने बालकांच्या हक्कांसाठी बाल अत्याचार प्रतिबंध तसेच बाल विवाह मुक्त भारत मोहिमे अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये जनजागृती कार्यक्रम राबवित येणार असल्याचे सांगितले आहे.
गावपातळीवर शासनाशी निगडित असलेल्या सर्व घटकांना एकत्र करून हे अभियान राबविण्यात येणार्या आहे.
बाल विवाह रोखण्यासाठी गावातील नागरिक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका एकत्र येत संबंधित व्यक्तीचे सामोपदेशन करीत बालविवाह रोखतील, असे न केल्यास शासनास तक्रार करीत बाल विवाह रोखण्यात येईल. – धनराज खरे, प्रकल्प अधिकारी





