Shruti Haasan video : “प्लीज, अण्णा! मी सिनेमात आहे”. कुली सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्रीवर असं म्हणण्याची वेळ का आली? व्हिडीओ व्हायरल

Shruti Haasan video : सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘कुली’ सिनेमा बॅाक्स अॅाफिसवर धुव्वा करत आहे. दोनच दिवसांत या सिनेमाने तब्बल ११८ कोटींची कमाई केली आहे. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षक सिनेमाची प्रशंसा करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षक प्रतिक्रिया देत आहेत. अशातच आता या सिनेमात अभिनय करणारी अभिनेत्री श्रुती हासनचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ १४ अॅागस्टच्या दिवशीचा आहे. या दिवशी श्रुती चेन्नईतील वेत्री थिएटमध्ये पोहचली. मात्र, तिची गाडी गेटवर थांबवण्यात आली. त्यावेळी अभिनेत्रीने चक्क सुरक्षा रक्षकाला प्लीज, अण्णा! मी या सिनेमात असल्याचं सांगावं लागलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून यावर प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.
My man Raayal over performed his duty 🫡 😆
Hilarious moment 😝
Thanks for being with us @shrutihaasan mam … Hope you enjoyed the show !!!#CoolieFDFS in #Vettri
Video credits – Yungraja pic.twitter.com/l0NRkrE6XU
— Rakesh Gowthaman (@VettriTheatres) August 15, 2025
थिएटर्स मालकाने व्हिडीओ केला शेअर
श्रुती हासनच्या २३ सेकंदांच्या व्हिडीओ पाहून कुणालाही हसू आवरता येणार नाही. वेत्री थिएटर्सचे मालक राकेश गौतमन यांनी हा व्हिडिओ एक्सवर पुन्हा पोस्ट केला आहे. वेत्री थिएटर्सचे मालक राकेश यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझा मित्र रॉयलने त्याचे कर्तव्य चांगले बजावले. खूप मजेदार क्षण. आमच्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद श्रुती हासन मॅडम… आशा आहे की तुम्हाला शो आवडला असेल!’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
व्हिडीओमध्ये श्रुती आणि तिची मैत्रिणी एका कारमध्ये असल्याचे दिसतं आहे. वेत्री थिएटरच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना रायल नावाचा एक सुरक्षा रक्षक त्यांची गाडी गेटवर थांबवतो. त्यानंतर श्रुती म्हणते “मी सिनेमात आहे. कृपया मला आत येऊ द्या, अण्णा. मी नायिका आहे सर.” तर मागे बसलेल्या अभिनेत्रीच्या मैत्रिणी मोठ्याने हसत आहेत. यानंतर सुरक्षा रक्षक त्यांची गाडीला आत जाऊ देतो.
या व्हिडीओवर एका युजरने लिहिले की, ज्या पद्धतीने सांगितलं ते मला खूप आवडले.’ “यावरून त्यांच्या मनात लोकांबद्दल किती आदर आहे हे दिसून येते.’ दुसऱ्या एका युजरने, ‘ही अण्णांची शैली आहे आता मोफत तिकिटे नाहीत.’ अशी कमेंट केली आहे.
हेही वाचा : दिल्लीकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, द्वारका एक्सप्रेसवेमुळे एक तासाचा प्रवास २० मिनिटांत पार





