दिल्लीकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, द्वारका एक्सप्रेसवेमुळे एक तासाचा प्रवास २० मिनिटांत पार
Dwarka Expressway | देशातील पहिला ८ पदरी एक्सप्रेसवे पूर्ण झाला आहे. अर्बन एलिव्हेटेड द्वारका एक्सप्रेसवे आता दिल्लीकरंच्या सेवेत येत असून त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे एक तासाचा प्रवास २० मिनिटांत पूर्ण होऊ शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार, १७ ऑगस्ट रोजी ८ आठ पदरी एक्सप्रेसवेचे उद्घाटन करतील. यावेळी द्वारका एक्सप्रेसवे आणि अर्बन एक्सटेंशन रोड-२ चे उद्घाटन केले जाईल. या एक्सप्रेसवेच्या सुरुवातीपासून गुरुग्राममध्ये राहणाऱ्या लोकांना सर्वात जास्त फायदा होईल. या एक्सप्रेसवेमुळे राष्ट्रीय महामार्ग-४८ वरील वाहतूक कोंडी जवळजवळ संपेल. या एक्सप्रेसवेमुळे गुरुग्रामहून निघाल्यानंतर १० मिनिटांत विमानतळावर पोहोचू शकता.
याशिवाय, अर्बन एक्सटेंशन रोड-२ सुरू झाल्यानंतर, सोनीपत आणि पानिपत महामार्गावर पोहोचण्यासाठी एक तासापेक्षा कमी वेळ लागेल. एकूणच, हे दोन्ही प्रकल्प दिल्ली-एनसीआरच्या लोकांना दिलासा देणार आहेत. दिल्लीतील यशोभूमी येथे दोन्ही एक्सप्रेसवेचे जंक्शन बांधण्यात आले आहे. Dwarka Expressway |
५० टक्के वाहतूक कमी होणार
पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातून येणारे लोक २० मिनिटांत विमानतळावर पोहोचतील तर धौला कुआंहून गुरुग्रामला जाणाऱ्या रस्त्यावरील ५० टक्के वाहतूक कमी होईल. या एक्सप्रेसवेमुळे दिल्ली ते गुरुग्राम हे अंतर सुमारे २० मिनिटांत पूर्ण होईल. याशिवाय, जर तुम्हाला नोएडाहून दिल्ली विमानतळावर जायचे असेल तर तुम्हाला फक्त २० मिनिटे लागतील. सध्या, त्यासाठी एक ते दीड तास लागतो. गुरुग्रामच्या सर्व क्षेत्रांव्यतिरिक्त, या एक्सप्रेसवेचा फायदा हरियाणाच्या ८ जिल्ह्यांना होईल. Dwarka Expressway |
देशातील सर्वात रुंद ३.६ किमी लांबीचा बोगदा
द्वारका एक्सप्रेसवेवर देशातील सर्वात रुंद ३.६ किमी लांबीचा बोगदा बांधण्यात आला आहे. याशिवाय, अनेक उड्डाणपूल आणि अंडरपास देखील बांधण्यात आले आहेत. एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूला तीन-लेन सेवा रस्ता देखील बांधण्यात आला आहे. या एक्सप्रेसवेवर एक बुद्धिमान वाहतूक व्यवस्था देखील आहे, जी सुरक्षित आणि चांगला प्रवास प्रदान करेल. Dwarka Expressway |
द्वारका एक्सप्रेसवेची वैशिष्ट्ये
१. अर्बन एलिव्हेटेड द्वारका एक्सप्रेसवे हे रस्त्याचे नाव
२. एकूण लांबी २९ किमी, रुंदी सुमारे ३४ मीटर
३. १८.९ किमी हरियाणामध्ये, १०.१ किमी दिल्लीमध्ये
४. दिल्लीतील महिपालपूर ते गुरुग्राममधील खेरकी दौला टोल प्लाझा
५. दोन लाख मेट्रिक टन स्टील आणि २० लाख घनमीटर सिमेंट
६. एकूण ९ हजार कोटी रुपये खर्च
७. हा प्रकल्प २०१८ ते २०२५ निर्माण कालावधी (कोव्हिडमुळे उशीर)
८. सिंगार पिलरवर ८ लेन रस्ता
९. दोन ठिकाणी भारतातील पहिला चार-स्तरीय इंटरचेंज
१०. नऊ ठिकाणी तीन-स्तरीय इंटरचेंज
११. सर्वात रुंद असा ३.६ किमी ८ लेन लांबीचा बोगदा
हेही वाचा :
Coolie Box Office : फायर नही वाइल्ड फायर! बॅाक्स अॅाफिसवर कुलीचा धुव्वा; पाहा दोन दिवसांचे कलेक्शन…





