Satara | डॉल्बी मर्यादेतच वाजवा, विसर्जन मिरवणूक मात्र सलग होणार

सातारा, {प्रतिनिधी} – विसर्जन मिरवणुकीच्या मुद्द्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केल्याने थेट फोन केला.
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात बदल करू नका तसेच गणेश मंडळाचे कार्यकर्ते शेवटच्या दोन दिवसात सलग विसर्जन मिरवणूक कारें डॉल्बी वाजेल पण मर्यादितच अशा विविध मुद्द्यांवर उदयनराजे भोसले यांनी पोलीस अधीक्षकांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली
सातारा शहरातील चाळीसहून अधिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यात बैठक घेतल्यानंतर सायंकाळी उशिरा खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
यावेळी अशोक मोने पंकज चव्हाण अभिजीत बारटक्के श्रीकांत शेटे इत्यादी मंडळाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते
खासदार उदयनराजे भोसले कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे . पोलीस प्रशासनाला कार्यकर्त्यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर उदयनराजे यांनी थेट पोलीस अधीक्षक समीर शेख यांना फोन लावला आणि त्यांच्याशी चर्चा केली.
विसर्जन मिरवणूक मार्ग न बदलण्याचे आवाहन केले त्यावेळी काही गणपती मंडळाच्या मूर्ती प्रमाणापेक्षा जास्त उंच असल्याने ते बदल करायचे प्रायोजित होते असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
मात्र ते बदल करू नका असे उदयनराजे यांनी सुचवले तसेच पोलीस अधीक्षकांशी मी बोललो आहे डॉल्बी वाजवा पण मर्यादेमध्येच आणि लेझर किरणांचा अजिबात वापर करू नका ते डोळ्यांना चांगले नसतात अशा स्पष्ट सूचना उदयनराजे यांनी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिल्या
साताऱ्यामध्ये विसर्जन मिरवणूक शेवटच्या दोन दिवसांमध्ये सलग निघणार मात्र मिरवणूक काढायची रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत मिरवणूक थांबवायची आणि पुन्हा ती सकाळी सुरू करायची सातारा शहरातील वाहतूक बघता हे शक्य होणार नाही.
पुणे मुंबई येथे असे कोणतेही प्रकार घडत नाहीत मिरवणूक हे सलग होणार गणेशोत्सवाच्या परंपरेमध्ये कोणताही फरक पडता कामा नये त्यामुळे साताऱ्यातील संस्कृती ही सहकार्य करण्याची आहे.
कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि पोलिसांनी सबुरीची भूमिका घेऊन मंडळांना सहकार्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली त्यांच्या या भूमिकेचे सर्व गणेशोत्सव मंडळांनी टाळ्या वाजवून स्वागत केले





