पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक लवकर संपली; गेल्या वर्षी लागले होते इतके तास

Pune Ganeshotsav 2025 : कालपासून सुरू झालेली पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरूच आहे. पुणे पोलिसांकडून विसर्जन मिरवणूक लवकर संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गणेश उत्सवापूर्वी पुण्यातील विसर्जन मिरवणुकीवरून वाद झाला होता. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीला लवकर सुरूवात करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक लवकरच संपली आहे.
यंदा मिरवणुकीला सकाळी 9:30 वाजता करण्यात आली. पुण्यातील मानाच्या पाच गणपतीची विसर्जन मिरवणूक 5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी संपली. गेल्या वर्षी 10 वाजता सुरु झालेल्या मिरवणुका 9 तास 33 मिनिटं चालली होती. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मानाच्या गणपतींची मिरवणूक 1 तास 24 मिनिटं अगोदर संपली आहे.
दरम्यान, काल मध्यरात्रीनंतर पुण्यातील श्रीमंत भाऊसासेब रंगारी, अखिल मंडई , हुतात्मा बाबू गेणू या गणेश मंडळांच्या गणपतींचं विसर्जन मिरवणुका पार पडल्या. डेक्कन परिसरातील पांचाळेश्वर या घाटावर गणपतीचं विसर्जन करण्यात आलं आहे. यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर चा जयघोष करत बाप्पांना निरोप देण्यात आला.
मानाचे पाच गणपती
मानाचा पहिला कसबा गणपती – 4:35 वाजता म्हणजे 6 तास 35 मिनिटं मिरवणूक चालली.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती – 5:10 वाजता म्हणजे 7 तास 10 मिनिटं मिरवणूक चालली.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती – 6:44 वाजता म्हणजे 8 तास 44 मिनिटं मिरवणूक चालली.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती – 7:15 वाजता म्हणजे 9 तास 15 मिनिटं मिरवणूक चालली.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती – 7:33 वाजता म्हणजे 9 तास 33 मिनिटं मिरवणूक चालली.
याशिवाय श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती विसर्जन पहाटे 3.50 वाजता झालं. यामुळे आता इतर गणेश मंडळांच्या मिरवणुकीला किती कालवधी जाणार हे पाहाव लागणार आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ ला तब्बल २८ तास ४५ मिनिटे गणपती विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.





