प्लास्टिकचा टॉप अन् साप… भूमी पेडणेकर अनोख्या ड्रेसमुळे ट्रोल

Bhumi Pednekar Troll | बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. परंतु अनेकदा ती हटके अंदाजामुळे देखील चर्चेत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहे एका इव्हेंटसाठी भूमीने केलेल्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या अनोख्या ड्रेसिंग सेन्समुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे.
भूमी पेडणेकर 27 सप्टेंबर रोजी एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. भूमीने प्रवेश करताच सर्वांच्या नजरा तिच्या ड्रेसवर खिळल्या. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा एथनिक ड्रेस परिधान केला होता.
तिने परिधान केलेला टॉप पारदर्शक प्लास्टिकचा होता. त्याच्या दोन्ही बाजूला साप होते. याचे काही फोटो तिने इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. भूमिचे हे फोटो आयफा अवॉर्ड्स 2024 दरम्यानचे आहेत. या कार्यक्रमासाठी भूमिने एथनिक लूक निवडला होता, पण तिच्या लुकवरून टीका केली जात आहे.
View this post on Instagram
भूमी पेडणेकरचा हा लूक अनेकांना आवडला नाही. या फोटोवर कमेंट करत काहींनी तिची तुलना अभिनेत्री उर्फी जावेदसोबत केले आहे. एका यूजरने लिहिले की, ‘मला वाटते की उर्फीचा ड्रेसिंग सेन्स यापेक्षा चांगला आहे.’
भूमी पेडणेकरच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, ती शेवटची ‘भक्षक’ मध्ये दिसली होती. हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. त्याशिवाय ती ‘टायलेट एक प्रेमकथा’, ‘बधाई दो’, ‘शुभ मंगल सावधान’ और ‘सांड की आंख’ या चित्रपटात दिसली होती.





