IPL 2025 Final : आरसीबी-पंजाब सामना पावसामुळे रद्द झाला, तर जेतेपदाचा फैसला कसा होणार?

IPL 2025 Final RCB vs PBKS Updates : आज आयपीएल २०२५ चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा विजेतेपदाचा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी अजून एकदाही ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे आयपीएलच्या १८ व्या हंगामात नवा विजेता पाहिला मिळणार आहे. या मैदानावर क्वालिफायर-२ चा सामना खेळवण्यात आला होता, जो पावसामुळे उशिरा सुरू झाला. अशा परिस्थितीत, जर पावसामुळे अंतिम सामना सुरू होऊ शकला नाही, तर निकाल कसा लागणार आणि कोण विजेता ठरणार जाणून घेऊया?
सर्वप्रथम, जर आपण अहमदाबादमधील हवामान परिस्थिती पाहिली तर मंगळवारी पावसाची शक्यता ६४ टक्के आहे. आकाश ढगाळ राहण्याची आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. सामन्यादरम्यान आकाश ढगाळ असू शकते, परंतु पावसाची शक्यता जवळजवळ नाही.
Countdown’s 🔛. So is destiny ❤
Who will walk away as the 𝐍𝐞𝐰 𝐂𝐡𝐚𝐦𝐩𝐢𝐨𝐧 tonight? 🏆#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @RCBTweets | @PunjabKingsIPL pic.twitter.com/LOIImXfXpI
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
जर सामना रद्द झाला, तर कसा लागणार निकाल?
आरसीबी आणि पीबीकेएस यांच्यातील अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाणार आहे, परंतु जर पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही, तर नियमांनुसार अंतिम सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. बीसीसीआयने ४ जून हा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. जर राखीव दिवस देखील पावसामुळे वाया गेला तर सामना रद्द घोषित केला जाईल.
हेही वाचा – IPL Trophy price : ‘IPL’च्या चमकदार ट्रॉफीची किंमत किती? ट्रॉफी खरंच सोन्याची असते का? किंमत एकदा पाहाच….
कोण ठरणारा विजेता –
जर अंतिम सामना रद्द झाला तर पंजाब किंग्जला चॅम्पियन आणि आरसीबीला उपविजेते घोषित केले जाईल. पॉइंट टेबलमध्ये पंजाब किंग्ज आरसीबीच्या वरच्या स्थानावर राहिल्याने पंजाब विजेता ठरेल. दोन्ही संघांचे लीग टप्प्यात समान गुण (१९) होते. मात्र पंजाब किंग्जचा नेट रन रेट (+०.३७२) होता आणि आरसीबीचा नेट रन रेट (+०.३०१) होता. यापूर्वी कधीही आयपीएल फायनलमध्ये सामना रद्द होण्याची परिस्थिती निर्माण झाली नव्हती, परंतु जर आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये पाऊस पडला तर पंजाब सामना न खेळता चॅम्पियन ठरेल.





