PKL Auction 2024 : लिलावाच्या पहिल्याच दिवशी 8 खेळाडू झाले कोट्याधीश..! ‘हा’ खेळाडू ठरला सर्वात महागडा…

Pro Kabaddi League Auction 2024 (Day 1) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामाचा दोन दिवसीय लिलाव 15 ऑगस्टपासून सुरू झाला. पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंवर बोली लागली. पहिल्या दिवशी एकूण 8 खेळाडू करोडपती झाले. ज्यामध्ये 1 विदेशी खेळाडूचाही समावेश होता. या हंगामासाठी, सर्व संघांनी तीन श्रेणींमध्ये एकूण 88 खेळाडूंना कायम ठेवले आहे. बघूया पहिल्या दिवशी लिलाव कसा झाला आणि कोण आहेत ते 5 खेळाडू ज्यांना सर्वाधिक रक्कम देण्यात आली.
सचिन तन्वर PKL 2024 चा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे, ज्याचे एकूण वेतन 2.15 कोटी आहे. आता तो तमिळ थलायवासकडून खेळताना दिसणार आहे. इराणचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मदरेझा शादलोई छायानेह हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला हरियाणा स्टीलर्सने 2.07 कोटी रुपयांना विकत घेतले. पवन सेहरावत तिसरा महागडा खेळाडू ठरला. ज्याला तेलुगू टायटन्सने 1.725 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. चौथा सर्वात महागडा खेळाडू गुमान सिंग होता, त्याला गुजरात जायंट्सने 1.97 कोटी रुपयांना विकत घेतले. तेथेच पाचवा महागडा खेळाडू सुनील कुमार याला यू मुम्बाने 1 कोटी 1 लाख 50 हजार रुपयांना खरेदी केले.
PHEW! What an auction it has been so far 🔥
Here are the 🔝 5 buys from Day 1 😎#PKL #ProKabaddiLeague #PKLPlayerAuction #ProKabaddi #PKLAuctionOnStar pic.twitter.com/bjmhljzk4f
— ProKabaddi (@ProKabaddi) August 15, 2024
सचिन, चियानेह, गुमान सिंग, पवन सेहरावत, भरत, मनिंदर सिंग, अजिंक्य पवार आणि सुनील कुमार हे खेळाडू लिलावाच्या पहिल्या दिवशी एक कोटी रुपयांच्या क्लबचा भाग होते. यू मुम्बाने सुनील कुमारला 1.015 कोटी रुपयांना खरेदी केले आणि तो आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय बचावपटू ठरला. PKL च्या इतिहासात सर्वाधिक रेड पॉइंट मिळवणारा खेळाडू परदीप नरवालला बेंगळुरू बुल्सने 70 लाख रुपयांना विकत घेतले. तर अनुभवी बचावपटू सुरजीत सिंगला जयपूर पिंक पँथर्सने 60 लाख रुपयांना विकत घेतले.
Here’s how the team purses look like ahead of Day 2️⃣ #PKLPlayerAuction 🔨👛#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKL pic.twitter.com/u2czs2JixB
— ProKabaddi (@ProKabaddi) August 16, 2024
कोणत्या संघाकडे किती पैसे आहेत शिल्लक…?
बंगाल वॉरियर्स : 1.97 कोटी
बेंगळुरू बुल्स : 1.21 कोटी
दबंग दिल्ली : 2.16 कोटी
गुजरात जायंट्स : 1.91 कोटी
हरियाणा स्टीलर्स : 49.59 लाख
जयपूर पिंक पँथर्स : 1.69 कोटी
पाटणा पायरेट्स : 2.87 कोटी
पुणेरी पलटण : 1.85 कोटी
तमिळ थलैवा : 41.94 लाख
तेलुगु टायटन्स : 1.19 कोटी
यू मुंबा : 1.05 कोटी
यूपी योद्धा : 1.44 कोटी





